मुंबई: दसरा मेळाव्यावरून उद्धव ठाकरे गट व शिंदे गट यांच्यामध्ये चालू असलेली रस्सीखेच आता संपुष्टात आली आहे. दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांनी केलेला अर्ज एमएमआरडीएने स्वीकारला असून, त्यांना वांद्रे-कुर्ला संकुलात परवानगी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने ज्या मैदानासाठी अर्ज केला होता ते मैदान आरक्षित असल्याने तो अर्ज फेटाळण्यात आला
प्रथम अर्ज करणाऱ्यास प्राधान्य या नियमांतर्गत एमएमआरडीएकडून शिंदे गटाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर शिवसेनेकडून बीकेसीतील दुसऱ्या मैदानासाठी परवानगी मागण्यात आली होती. पण ते मैदान आधीच एका कंपनीकडून कार्याक्रमासाठी आरक्षित करण्यात आल्याने ठाकरे गटाची परवानगी नाकारण्यात आली आहे.