ED

पुण्यात ईडीची मोठी कारवाई; रोझरी स्कूलच्या इमारतीसह विनय अरान्हा यांची मालमत्ता जप्त

789 0

पुणे: पुण्यातील रोझरी रोझरी एज्युकेशन ग्रुप आणि विनय अरान्हा आणि विवेक अरान्हा यांच्यावर सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली असून 47.1 कोटी रुपयांच्या 4 स्थावर मालमत्ता जप्त केल्या.

कॉसमॉस बँकेचे शिवाजी विठ्ठल काळे यांच्या तक्रारीवरून पुणे पोलिसांनी विनय अरान्हा आणि विवेक अरान्हा यांच्या विरोधात एफआयआर नोंदवल्यानंतर ईडीने तपास सुरू केला होता.

विनय अरान्हा आणि विवेक अँथनी अरान्हा यांच्या विरोधात एफआयआर नोंदवल्यानंतर ईडीने तपास सुरू केला असून, आरोपींनी बनावट मालमत्तेची कागदपत्रे सादर करून कॉसमॉस बँकेतून 20.44 कोटी रुपये कर्ज घेतलं होतं ज्यामध्ये आरोपींनी बनावट मालमत्तेची कागदपत्रे सादर करून कॉसमॉस बँकेकडून 20.44 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप आहे.

ईडीने सांगितले की, त्यांच्या तपासात असे दिसून आले आहे की आरोपींनी 2013-14 मध्ये कॉसमॉस कोऑपरेटिव्ह बँक पुणे कडून कार कर्जासह अनेक कर्जे गहाण ठेवण्यासाठी आणि कर्ज मिळविण्यासाठी जादा मुल्यांकन सादर करून अनेक कर्जे मिळविली आहेत.

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!