सुपरफास्ट

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तातडीनं श्रीनगरला रवाना

जम्मू काश्मीर मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झाला असून यामधील पुण्यातील दोन पर्यटकही जखमी झाले आहेत.

या हल्ल्यानंतर केंद्र सरकार ॲक्शन मोडवर आलं असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तातडीने श्रीनगरला रवाना झाले. दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर अमित शाह हे श्रीनगरला रवाना झाले आहेत.