आषाढी वारीसाठी लालपरी सज्ज; वल्लभनगर आगारातून भाविकांसाठी प्रत्येक दिवसाला 15 बसेस सुटणार

118 0

पुणे: आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तसेच देहू येथून संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान केले असून दोन वर्ष आषाढी वारी कोरोनामुळे घडलेली नव्हती त्यामुळे यावर्षी दोन्ही पालख्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे या दोन्ही पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांची संख्या यावर्षी जास्त आहे .

पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागातील वारकऱ्यांना वल्लभनगर बस स्थानकाच्या अधिकाऱ्यांकडून सूचना जारी करण्यात आल्या आहेत गेल्या दोन वर्षापासून आषाढी वारीही झाली नव्हती पण यावर्षी आषाढी वारीही मोठ्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडत आहे वारकऱ्यांची संख्या जास्त प्रमाणात असल्याने वल्लभनगर आगारातून तसेच स्वारगेट बस स्थानकातून 250 हुन अधिक बसेस सुटणार आहेत अशी माहिती वल्लभनगर बस स्थानकातील अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

त्याचबरोबर ग्रुप बुकींग करणाऱ्या साठी देखील वल्लभ नगर आगार विशेष सवलत देण्यात येणार असून भजनी मंडळ किंवा मोठा ग्रुप असेल तर त्यांना घरापासून ते पंढरपूर पर्यंत प्रवास एसटी प्रवास करता येणार आहे . यासाठी दररोज 15 बस सोडण्यात येणार आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!