भंडाऱ्यात धान खरेदी बंद; शेतकऱ्यांचा संताप उसळला
भंडाऱ्यातून एक महत्त्वाची बातमी . धान खरेदीचं उद्दिष्ट संपल्याचं कारण देत प्रशासनाने खरेदी बंद केल्यामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांचा मोठा संताप पाहायला मिळतोय.
भंडारा शहरात हजारो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. त्रिमूर्ती चौक परिसरातून निघालेल्या या मोर्चात शेतकऱ्यांनी ‘धान आमचं निर्णय तुमचा कसा?’ अशा घोषणा देत प्रशासनाचा निषेध केला. शासनाने दिलेल्या खरेदीच्या मर्यादेमुळे अनेक केंद्रांवर धान स्वीकारणं बंद झालं आहे. परिणामी, नोंदणी करूनही हजारो शेतकऱ्यांचे धान अजूनही घरात किंवा उघड्यावर पडून आहे
. यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे . आंदोलनात सरपंच संघटना आणि किसान संघाने सक्रिय सहभाग नोंदवला. डॉ. प्रशांत पडोळे यांनी स्वतः मोर्चात सामील होऊन, जोपर्यंत शेवटच्या नोंदणीकृत शेतकऱ्याचं धान घेतलं जात नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे.
