Sania Mirza and Shoaib Malik

Sania Mirza and Shoaib Malik : टेनिस स्टार सानिया मिर्झाने शोएब मलिकला दिलेल्या ‘खुला’चा अर्थ नेमका काय आहे?

994 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने (Sania Mirza and Shoaib Malik) तिसऱ्यांदा पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केलं आहे. खुद्द जोडप्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. शोएब आणि त्याची दुसरी पत्नी सानिया मिर्झा यांच्यात मागच्या काही महिन्यांपासून बिनसले होते. त्याच्या घटस्फोटाच्या चर्चा मोठ्या प्रमाणात रंगल्या होत्या. यादरम्यान आता सना जावेदसोबत लग्न करून शोएब मलिकने या सर्व शंकाना पूर्णविराम दिला आहे.

शोएब मलिकच्या तिसर्‍या लग्नाने सगळेच हैराण झाले आहेत. सानिया मिर्झाच्या घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब असे काही करेल अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. या सगळ्या प्रकरणावर सानिया मिर्झाचे वडील इम्रान मिर्झा यांनी प्रतिक्रिया दिली होती. यावेळी ते शोएब मलिक खुला असल्याचे म्हणाले. मुस्लीम समाजात नेहमीच तलाकची चर्चा होत असते. मात्र आता खुला म्हणजे काय? याची चर्चा सुरु झाली आहे. चला तर मग आज खुला आणि तलाक यांच्यात काय फरक आहे ते जाणून घेऊया…

खुला आणि तलाकमध्ये काय फरक आहे?
‘खुला’ हा इस्लाममध्ये महिलांना दिलेला अधिकार आहे, ज्यामुळे त्यांना घटस्फोट घेण्याचा पर्याय दिला जातो. सोप्या भाषेत, खुला म्हणजे ज्यामध्ये मुस्लिम महिला तिच्या पतीला एकतर्फी घटस्फोट देऊ शकते. हा त्यांचा हक्क आहे. घटस्फोटानंतर मुलांचे शिक्षण आणि आर्थिक पाठबळ देण्याची जबाबदारी पतीची असते. खुला हा तलाक आहे जो मुस्लिम महिला कोणत्याही न्यायालयीन कारवाईशिवाय करू शकते. खुला दिल्यानंतर पत्नीला कोर्टात केस दाखल करण्याची गरज नाही. खुलामध्ये, स्त्री तिच्या पतीला लेखी घटस्फोट प्रमाणपत्र पाठवून एकतर्फी आणि स्वेच्छेने घटस्फोट देऊ शकते.

गेल्या काही वर्षांपासून सानिया आणि शोएब मलिक क्वचितच एकत्र दिसले होते. काही दिवसांपूर्वी शोएब मलिकनेही सानियाला इंस्टाग्रामवर अनफॉलो केले होते. शोएब आणि सानियाने एप्रिल 2010 मध्ये हैदराबादमध्ये लग्न केले होते. त्यांना एक मुलगा आहे. सध्या त्याचा ताबा सानिया मिर्झाकडे आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Devendra Fadnavis : फडणवीसांनी सांगितलं कारसेवेचा Photo दाखवण्याचं कारण; म्हणाले…

Sridevi Prasanna : “दिल में बजी गिटार”; सई ताम्हणकर-सिद्धार्थ चांदेकर यांच्या ‘श्रीदेवी प्रसन्न’ सिनेमातील नवं गाणं रिलीज

Accident Video : घोडागाडी शर्यतीत ट्रॅकवर चारचाकी उलटली; अपघाताचा Video आला समोर

Viral Video : बैलगाडा स्पर्धेतील बैल उधळल्याने 4 जण जखमी

Shri Ram Chalisa : नित्य श्रीराम चालीसाचे पठण केल्याने होतात ‘हे’ मोठे फायदे

Ram Mandir : 22 जानेवारीच्या सार्वजनिक सुट्टीच्या निर्णायाविरोधात न्यायालयात याचिका दाखल

Ram Mandir : 22 जानेवारीला तुमच्या घरी कशाप्रकारे कराल श्रीरामाची पूजा

Bus Accident : नाशिकमध्ये प्रवाशांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात

Ram Mandir : कोण आहे कांबळे दाम्पत्य? ज्यांना महाराष्ट्रातून मिळाला रामलल्लांच्या महापुजेचा मान

Sharad Pawar : ‘…अन् पाकिस्तानच्या गोळीबारातून आम्ही थोडक्यात वाचलो’, शरद पवारांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!