Virat Kohli

Virat Kohli : कोहली ‘विराट’ विक्रमापासून 1 पाऊल दूर; अशी कामगिरी करणारा ठरणार जगातील पहिला फलंदाज

697 0

मुंबई : आयपीएल 2024 स्पर्धेत विराट कोहली (Virat Kohli) जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळताना त्याने 3 सामन्यात 2 अर्धशतके झळकावत त्याने 181 धावांपर्यंत मजल मारली आहे. आयपीएल 2024 स्पर्धेतील 15 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा सामना लखनऊ सुपरजायंट्स संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्यात विराट एक खास विक्रम आपल्या नावावर करू शकतो.

काय आहे तो विक्रम?
लखनऊ सुपरजायंट्स संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात विराट कोहलीला इतिहास रचण्याची संधी असणार आहे. विराटने जर या सामन्यात 132 धावांची खेळी करताच त्याला टी-20 क्रिकेटमध्ये एकाच संघासाठी खेळताना 8 हजार धावा करण्याची संधी असणार आहे. टी-20 क्रिकेटमधील एकाच सामन्यात 132 धावांची खेळी करणं थोडं कठीण आहे.मात्र त्याचा फॉर्म पाहता, तो हा रेकॉर्ड याच सामन्यात करु शकतो.

विराटच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने 255 सामन्यांमध्ये 7868 धावा केल्या आहेत. यात आयपीएल आणि चॅम्पियन लीग स्पर्धेतील धावा एकत्रित करण्यात आल्या आहेत. त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळताना 8000 धावा पूर्ण करण्यासाठी 132 धावांची गरज आहे. त्याच्या आयपीएल स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने 7444 धावा केल्या आहेत. तसेच चॅम्पियन्स लीग स्पर्धेत खेळताना त्याने 15 सामन्यांमध्ये 424 धावा केल्या आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुण्याची खासदारांची विशेष परंपरा मुरलीधर मोहोळ जोपासणार : नारायण राणे

Manoj Jarange : चव्हाणांची गाडी अडवणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Loksabha Elections : पंतप्रधान मोदी, शाह महाराष्ट्रात फुंकणार प्रचाराचं रणशिंग; ‘या’ 2 मतदारसंघातून करणार सुरुवात

Urfi Javed : हाय गर्मी ! म्हणत एअरपोर्टवर उर्फीने काढले कपडे

Jalgaon News : विजेचा धक्का लागल्याने 11 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Sassoon Hospital : उंदीर चावल्यामुळे तरुणाचा मृत्यू; ससूनमधील धक्कादायक प्रकार

Pune News : स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या इतिहासाला देण्यात आला उजाळा

Gadchiroli News : गडचिरोलीत सुरक्षा दलाकडून मोठी कारवाई; 8 माओवादी ठार

Shirpur Police : पावणेतीन लाखांची अवैध दारू जप्त; शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई

Loksabha Election: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे स्टार प्रचारक जाहीर; 40 दिग्गजांचा समावेश

Heena Gavit : चर्चेतील महिला : हीना गावित

Water Supply : गुरुवारी पुण्यात पाणीपुरवठा असणार बंद; महापालिकेने पाणी जपून वापरण्याचे केले आवाहन

Sangli Accident : सांगलीमध्ये भीषण अपघात ! 4 ऊसतोड मजूरांचा जागीच मृत्यू

Chandrakant Patil : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा अपघात

Uttanasana : उत्तानासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!