नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा कर्णधार आणि ओपनर रोहित शर्माने (Rohit Sharma) एक असा विक्रम आपल्या नावावर केला आहे.जो अजूनपर्यंत कोणत्याच भारतीयाने केला नाही आहे. वर्ल्ड कप 2023 मधील 11 सामन्यांमध्ये रोहितने 54.27च्या सरासरीने 597 धावा करण्याची कामगिरी केली असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 कॅलेंडर वर्षात 50+ धावांची सरासरी नोंदवणारा रोहित शर्मा हा पहिला फलंदाज ठरला आहे.
रोहितने 2023 मध्ये 27 वनडे सामन्यांमध्ये 52.29 च्या सरासरीने दोन शतकांसह 1255 धावा केल्या आहेत. तसेच पुढील महिन्यात डिसेंबरमध्ये होणार्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत रोहित शर्माच्या नावाचा समावेश नाही. त्यामुळे रोहित 52.29 च्या वनडे सरासरीने 2023 वर्षाचा शेवट करेल हे निश्चित आहे. रोहित शर्माने 2011, 2013, 2014, 2015, 2016, 2017, 2018, 2019, 2020 आणि 2023 मध्ये वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सरासरी 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. 2007 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या रोहित शर्माने आतापर्यंत 262 वनडे सामने खेळले आहेत आणि 31 शतकांसह 49.12 च्या सरासरीने 10709 धावा केल्या आहेत, ज्या दरम्यान 264 धावा ही त्याची सर्वोच्च खेळी होती.
रोहित शर्माने ‘या’ कॅलेंडर वर्षात वनडे सामन्यात सरासरी 50+ धावांची नोंद केली
2011 : 55.54 च्या सरासरीने 16 मॅचमध्ये 611 धावा
2013 : 52.00 च्या सरासरीने 28 मॅचमध्ये 1196 धावा
2014 : 52.54 च्या सरासरीने 12 मॅचमध्ये 264 धावा
2015 : 50.93 च्या सरासरीने 17 मॅचमध्ये 815 धावा
2016 : 62.66 च्या सरासरीने 10 मॅचमध्ये 564 धावा
2017 : 71.83 च्या सरासरीने 21 मॅचमध्ये 1293 धावा
2018 : 73.57 च्या सरासरीने 19 मॅचमध्ये 1030 धावा
2019 : 57.30 च्या सरासरीने 28 मॅचमध्ये 1490 धावा
2020 : 57.00 च्या सरासरीने 3 मॅचमध्ये 171 धावा
2023 : 52.29 च्या सरासरीने 27 मॅचमध्ये 1255 धावा
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Shocking News : धक्कादायक ! खोकल्याचे औषध घेतल्याने 5 जणांचा मृत्यू
World AIDS Day : दरवर्षी 1 डिसेंबरलाच का असतो जागतिक एड्स दिन?
Datta Dalvi : ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींना जामीन मंजूर
Ajit Pawar : लोकसभेच्या ‘या’ जागा लढवणार; कर्जतच्या शिबिरात अजितदादांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar : ‘सरकारमध्ये जा मी राजीनामा देतो असं शरद पवार म्हणाले’ अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
Supriya Sule : बारामतीत अजित पवार उमेदवार देण्याच्या विधानावर सुप्रिया सुळेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया
Ashish Nehra’s Prediction : आशिष नेहराचा रिंकू सिंगबद्दलचा ‘तो’ अंदाज ठरला खरा