Ravindra Jadeja

Ravindra Jadeja : अखेर जडेजा बनला क्रिकेटचा ‘थालापथी’; CSK ने केली मोठी घोषणा

838 0

चेन्नई सुपर किंग्स कडून इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 22 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 7 विकेट्सने विजय मिळवला. एमए चिदंबरम (चेपॉक) स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नईला विजय मिळवून देण्यात अष्टपैलू रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) मोठी कामगिरी केल्यामुळे त्याला सामन्यात सामनावीर पुरस्कारही देण्यात आले होते.

धोनीला गेल्या अनेक वर्षांपासून चेन्नईच्या चाहत्यांनी थाला या नावाने प्रेमाने स्वीकारल्यामुळे अनेकदा धोनीला ‘थाला’ या टोपन नावानेही संबोधले जाते. धोनीसोबतच चेन्नईचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाला ‘चिन्ना थाला’ असे टोपन नाव दिले असून कर्णधार ऋतुराजला ‘रॉकेट राजा’ टोपण नावानेही संबोधले जाते.

थालापथी म्हणजे काय?
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये थालापथी अभिनेता विजयला सुरुवातीच्या चित्रपटांमुळे ही ओळख मिळाली होती. मात्र आता क्रिकेटमध्ये जडेजालाही हे टोपननाव मिळाले असून थालापथीचा अर्थ कमांडर किंवा सेनापती असा होतो. अर्थातच जडेजा चेन्नई सुपर किंग्सचा सेनापती घोषित करण्यात आला आहे .धोनीला थाला म्हटले जाते, कारण त्याचा अर्थ नेता असा होतो, तर रैनाला चिन्ना थाला म्हटले जाते, ज्याचा अर्थ उपनेता किंवा नेत्याच्या उजवा हात समजला जाणारा व्यक्ती असते.

या दरम्यान, सोमवारी झालेल्या सामन्यात जडेजाने 4 षटकात अवघ्या 18 धावा देत 3 विकेट्स घेतल्या होत्या. त्याने सुनील नारायण, अंगक्रिश रघुवंशी आणि वेंकटेश अय्यर या तिघांच्या विकेट्स घेत फिल सॉल्ट आणि श्रेयस अय्यर यांचे झेलही घेतल्या होत्या. या सामन्यात कोलकाताचा संघाला 20 षटकात 9 बाद 137 धावाच करता आल्या मात्र चेन्नईने 17.4 षटकात 3 विकेट्स गमावत 138 धावांचे लक्ष्य पूर्ण केले.

Share This News
error: Content is protected !!