PUNE RUN FOR UNITY: मनीष राजपूत आणि अंकिता गावीत यांनी भारताचे लोहपुरुष आणि
राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या
१५० व्या जयंती निमित्ताने संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘पुणे रन फॉर युनिटी’, (PUNE RUN FOR UNITY)
महामॅरेथॉनमध्ये २१ किलोमीटर शर्यतीत अनुक्रमे
पुरुष आणि महिला गटात अव्वल क्रमांक मिळवला.
स. प. महाविद्यालयातून या महामॅरेथॉनला सुरुवात झाली.
केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आणि
पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील,
खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, आमदार सिद्धार्थ शोरेळ, आमदार हेमंत रासने,
आमदार भीमराव तापकीर, राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांच्या हस्ते शर्यतीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.
या वेळी फोर्स मोटर्सचे अध्यक्ष मकरंद कानडे, राकेश मारू, प्रवीण कर्णावत, फोर्स मोटर्सचे ग्रुप सीएफओ रिषी लुहारुका,
कर्णधार अभिनिल राय, पुणे विमानतळ संचालक संतोष ढाके,
सीआयएसएफ कमांडन्ट प्रताप पुंडे, पुणे महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम,
चितळे बंधू मिठाईवाल्याचे इंद्रनील चितळे, लोकमान्य कॉपरेटिव्ह सोसायटीचे सुशील जाधव उपस्थित होते.
या वेळी बोलताना मोहोळ म्हणाले,
‘जीवनमान आरोग्य संपन्न ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे.
त्यासाठी दैनंदिन आयुष्यातील तंदुरुस्ती, फिटनेस अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
पुणेकर (PUNE RUN FOR UNITY) अशा फिटनेस बाबत खूप जागरूक आहेत, याचा मला अभिमान वाटतो.
योगाभ्यास, चालणे, पळणे, सायकलिंग, जलतरण, अनेकविध खेळ खेळणे अशा अनेक आघाड्यांवर पुणेकर स्वतःला फिट ठेवण्यात अग्रेसर आहेत.
मॅरेथॉन सारख्या उपक्रमांनी पुणेकरांच्या याच फिटनेस प्रेमाला हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे.’
अर्धमॅरेथॉनसह १० किलोमीटर, पाच किलोमीटर, तीन किलोमीटरच्या शर्यतीही झाल्या.
‘पुणे रन फॉर युनिटी’मध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह २० हजारांहून अधिक धावपटू सहभागी झाले होते.
केनिया, इथिओपिया इत्यादी देशांतील आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन धावपटूंचा सहभाग होता.
मात्र, त्या सर्वांमध्ये भारतीय धावपटू सरस ठरले. २१ किलोमीटर धावण्याच्या शर्यतीत खुल्या गटात भारताच्या
मनीष राजपूतने १ तास ५ मिनिटे ०२ सेकंद वेळ नोंदवून अव्वल क्रमांक मिळवला. महिलांमध्ये अंकिता गावीतने बाजी मारली.
तिने १ तास १७ मिनिटे ४५ सेकंद वेळ नोंदवली.
विजेत्यांना एक लाख रुपये, उपविजेत्यास ७५ हजार रुपये आणि
तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूस पन्नास हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.
त्याचबरोबर सहभागी प्रत्येकाला टी-शर्ट, मेडल, नाश्ता देण्यात आला.
निकाल
भारतीय (खुला गट) –
पुरुष – मनीष राजपूत – १ तास ५ मि. ०२ से.
हाविश शेओरन – १ तास ५ मि. १५ से.
मनोज कुमार – १ तास ५ मि. ३१ से.
महिला –
अंकिता गावीत – १ तास १७ मि. ४५ से.
तामसी सिंह – १ तास १९ मि. १७ से.
रविना गायकवाड – १ तास २१ मि. २७ से.
परदेशी (खुला गट)
पुरुष – मिचेल कायलो मैथया (केनिया) – १ तास ७ मि. ११ से.
\पॉल केमेई (केनिया) – १ तास ७ मि. २४ से.
मेशाक म्बुगाअ (केनिया) – १ तास ८ मि. ३३ से.
महिला – किपटू कारोलिने (केनिया)
१ तास २० मि. २६ से.; पेनिनाह वाइथिरा (केनिया)
१ तास २३ मि. ९ से
देसी नेगेसे कितिला (इथिओपिया) १ तास ३१ मि. ३३ से.