Tania Singh

Tania Singh : मॉडेल तानिया सिंहची 28 व्या वर्षी आत्महत्या; ‘हा’ स्टार खेळाडू अडकला वादाच्या भोवऱ्यात

649 0

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL मधील सनराइजर्स हैदराबादचा खेळाडू वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सूरत येथील प्रसिद्ध मॉडेल तानिया सिंहने (Tania Singh) आत्महत्या करून आपल्या आयुष्याचा शेवट केला. या प्रकरणी सनराइजर्स हैदराबादच्या एका खेळाडूचे नाव समोर आले आहे. त्यामुळे हा खेळाडू वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा खेळाडू नेमका कोण आहे आणि हे प्रकरण नेमके काय आहे? त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया…

काय आहे नेमके प्रकरण?
मॉडेल तानिया सिंहने 20 फेब्रुवारी 2024 रोजी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे. तानिया गेल्या दोन वर्षांपासून फॅशन डिझायनिंग आणि मॉडेलिंग या क्षेत्रात शिक्षण घेत आहे. तिने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अद्याप समोर आलेले नाही. पोलीस याचा तपास करत आहेत. मात्र तपासादरम्यान तानियाचा फोन चेक करण्यात आला. त्यावेळी आयपीएल स्टार अभिषेक शर्माने मॉडेल तानिया सिंहला शेवटचा कॉल केल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलीस सध्या अभिषेकची चौकशी करत आहेत. प्रेमप्रकरणामुळे तानियाने आत्महत्या केली असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे अभिषेक शर्माच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

कोण आहे तानिया सिंह?
तानिया सूरतमधील एक लोकप्रिय फॅशन डिझायनर आणि मॉडेल आहे. इंस्टाग्रामवर तिने 10,000 पेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. इंस्टा बायोमध्ये तिने डिस्क जॉकी, मेकअप आर्टिस्ट आणि मॉडेल असे लिहिले आहे. तिने वयाच्या 28 व्या वर्षी आत्महत्या केली.

कोण आहे अभिषेक शर्मा?
अभिषेक शर्मा IPL मध्ये सनरायजर्स हैदराबाद टीमचा खेळाडू आहे. ऑलराऊंडर अशी त्याची ओळख आहे. आयपीएलमध्ये त्याने आपल्या खेळीने सगळ्यांना प्रभावित केले आहे. आयपीएलच्या 47 सामन्यात त्याने 137.38 सरासरीने 893 धावा केल्या आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pandhari Sheth Phadke : बैलगाडा शर्यतींचा बेताज बादशाह पंढरीशेठ फडके यांचे निधन

Accident News : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू

Pimpri-Chinchwad : पिपरी- चिंचवडमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

Maratha Reservation : मनोज जरांगेंनी पुन्हा उगारले आंदोलनाचं अस्त्र

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवडमधील मोरवाडी परिसरात टायरच्या गोडाऊनला भीषण आग

Parbhani News : महावितरणाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर ! शॉक लागून 3 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमणाच्या कारवाईदरम्यान पोलीस आणि नागरिकांमध्ये जोरदार राडा

Pune Crime : पुण्याचं उडता पंजाब होतंय का? आतापर्यंत पुणे पोलिसांकडून 2000 किलो एमडी ड्रग्ज जप्त

Zeeshan Siddique : काँग्रेसकडून झिशान सिद्दीकीची मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षपदावरून हकालपट्टी

Ameen Sayani Pass Away: रेडिओच्या सुवर्णयुगाचे शिल्पकार अमीन सयानी यांचे निधन

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!