IPL 2024 Retention

IPL 2024 Retention : IPL च्या सगळ्या संघाची रिटेन्शन यादी जाहीर

1210 0

आयपीएलच्या आगामी मोसमासाठी सर्व फ्रंचायझीने आज रिलीज आणि रिटेन खेळाडूंची यादी (IPL 2024 Retention) जाहीर केली आहे. रिलीज आणि रिटेन खेळाडूंची यादी अधिकृतपणे जाहीर करण्यासाठी आज शेवटचा दिवस होता. आता जवळपास सगळ्या संघाची कायम ठेवलेल्या आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची नावे समोर आली आहेत. चला तर मग जाणून घेऊया सगळ्या संघांच्या खेळाडूंची यादी…

चेन्नई सुपर किंग्ज
चेन्नई सुपर किंग्जने बेन स्टोक्ससह 8 खेळाडूंना सोडले आहे. यामध्ये बेन स्टोक्स, ड्वेन प्रिटोरियस, काइल जॅमिसन, आकाश सिंग, अंबाती रायुडू (निवृत्त), सिसंदा मगाला, भगत वर्मा, सुभ्रांशु सेनापती यांचा समावेश आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा सध्याचा संघ:
डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शेख रशीद, अजिंक्य रहाणे, मिचेल सँटनर, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, निशांत सिंधू, अजय मंडल, दीपक चहर, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, महिष तिक्षीना, सिमरजीत सिंग, राजवर्धन हंगरगेकर, मथिशा पाथीराना, प्रशांत सोळंकी.

राजस्थान रॉयल्स
राजस्थान रॉयल्सने 10 खेळाडूंना सोडले आहे. यामध्ये जो रूट, अब्दुल बासिथ, जेसन होल्डर, आकाश वशिष्ठ, कुलदीप यादव, ओबेद मॅकॉय, मुरुगन अश्विन, केसी करिअप्पा, केएम आसिफ यांचा समावेश आहे. 10 वा खेळाडू देवदत्त पडिक्कल याला ट्रेडच्या माध्यमातून लखनौला देण्यात आले आहे, तर लखनौचा आवेश खानला त्याच्या बदल्यात घेण्यात आले आहे.
राजस्थान रॉयल्सचा सध्याचा संघ:
संजू सॅमसन, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, कुणाल सिंग राठौर, डोनाव्हॉन फरेरा, ध्रुव जुरेल, जोस बटलर, रायन पराग, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, कुलदीप सेन, प्रसिध कृष्णा, नवदीप सैनी, ट्रेंट बोल्ट, अ‍ॅडम झाम्पा.

पंजाब किंग्ज
पंजाब किंग्जने 5 खेळाडूंना सोडले आहे. यामध्ये भानुका राजपक्षे, मोहित राठी, बलतेज धांडा, राज अंगद बावा आणि शाहरुख खान यांचा समावेश आहे.
पंजाब किंग्जचा सध्याचा संघ:
शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, हरप्रीत भाटिया, जितेश शर्मा, शिवम सिंग, अथर्व तायडे, सिकंदर रझा, ऋषी धवन, हरप्रीत ब्रार, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरन, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस, विद्धवत कवेरप्पा.

दिल्ली कॅपिटल्स
दिल्ली कॅपिटल्सने 11 खेळाडूंना सोडले आहे. यामध्ये रिले रुसो, चेतन साकारिया, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, फिल सॉल्ट, मुस्तफिजुर रहमान, कमलेश नागरकोटी, रिपल पटेल, सरफराज खान, अमन खान, प्रियम गर्ग यांचा समावेश आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा सध्याचा संघ:
ऋषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, यश धुल, मिचेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, विकी ओस्तवाल, एनरिक नॉर्खिया, खलील अहमद, लुंगी एनगिडी, इशांत शर्मा, मुकेश कुमार, कुलदीप यादव , प्रवीण दुबे.

कोलकाता नाईट रायडर्स
कोलकाता नाईट रायडर्सने 12 खेळाडूंना सोडले. यामध्ये शाकिब अल हसन, लिटन दास, आर्य देसाई, डेव्हिड वीसा, एन जगदीसन, मनदीप सिंग, कुलवंत खेजरोलिया, शार्दुल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, जॉन्सन चार्ल्स आणि टीम साऊदी यांचा समावेश आहे.
कोलकाता नाईट रायडर्सचा सध्याचा संघ:
श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, रहमानउल्ला गुरबाज, आंद्रे रसेल, नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, डेव्हिड विज, अनुकुल रॉय, सुनील नरेन, वैभव अरोरा, हर्षित राणा, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती.

सनरायझर्स हैदराबाद
सनरायझर्स हैदराबादने 6 खेळाडूंना सोडले आहे. यामध्ये हॅरी ब्रूक, समर्थ व्यास, कार्तिक त्यागी, विवरांत शर्मा, अकील हुसैन, आदिल रशीद यांचा समावेश आहे. शाहबाज अहमद ट्रेडने आरसीबीतून हैदराबादकडे आला आहे. त्याच्या जागी मयंक डागर आरसीबीमध्ये गेला आहे.
सनरायझर्स हैदराबादचा सध्याचा संघ:
एडन मार्कराम (कर्णधार), राहुल त्रिपाठी, मयंक अग्रवाल, हेनरिक क्लासेन, ग्लेन फिलिप्स, उपेंद्र यादव, नितीश कुमार रेड्डी, अनमोलप्रीत सिंग, सनवीर सिंग, अब्दुल समद, मार्को येनेसन, अभिषेक शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, वॉशिंग्टन सुंदर. कुमार, उमरान मलिक, टी नटराजन, मयंक मार्कंडे, फजलहक फारुकी.

गुजरात टायटन्स
गुजरातने 8 खेळाडूंना सोडले आहे. यामध्ये यश दयाल, केएस भरत, शिवम मावी, उर्विल पटेल, प्रदीप सांगवान, ओडियन स्मिथ, अल्झारी जोसेफ आणि दासुन शनाका यांचा समावेश आहे.
गुजरात टायटन्सचा सध्याचा संघ :
हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, केन विल्यमसन, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, वृध्दिमान साहा, मॅथ्यू वेड, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, विजय शंकर, जयंत यादव, दर्शन नळकांडे, मोहम्मद शमी,आर साई किशोर, मोहित शर्मा, नूर अहमद, राशिद खान.

मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्सने 11 खेळाडूंना सोडले आहे. यामध्ये मोहम्मद अर्शद खान, रमणदीप सिंग, हृतिक शौकीन, राघव गोयल, जोफ्रा आर्चर, ट्रिस्टन स्टब्स, डुआन यानसेन, झाय रिचर्डसन, रिले मेरेडिथ, ख्रिस जॉर्डन आणि संदीप वॉरियर यांचा समावेश आहे.
मुंबई इंडियन्सचा सध्याचा संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, विष्णू विनोद, नेहल वढेरा, शम्स मुलानी, अर्जुन तेंडुलकर, टिळक वर्मा, टीम डेव्हिड, शम्स मुलानी, कॅमेरॉन ग्रीन, जसप्रीत बुमराह, जेसन बेनडॉर्फ. , पियुष चावला, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 12 खेळाडूंना सोडले आहे. यामध्ये वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवूड, फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हिड विली, वेन पारनेल, सोनू यादव, अविनाश सिंग, सिद्धार्थ कौल, केदार जाधव यांचा समावेश आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सध्याचा संघ :
विराट कोहली, फाफ डुप्लेसिस (कर्णधार), दिनेश कार्तिक, अनुज रावत, रजत पाटीदार, सुयश प्रभुदेसाई, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, मयंक डागर, मनोज भडांगे, आकाश दीप, मोहम्मद सिराज, टॉप रॉस, मोहम्मद शर्मा. , हिमांशू शर्मा, राजन कुमार.

2024 च्या हंगामापूर्वी आयपीएल खेळाडूंचा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच हा लिलाव परदेशात पार पडणार आहे.हा लिलाव 19 डिसेंबर रोजी गकेबरहा येथे होणार आहे. प्रत्येक संघाकडे 2024 हंगामासाठी त्यांचा संघ तयार करण्यासाठी 100 कोटी रुपये असतील. जी मागील हंगामातील 95 कोटींच्या तुलनेत 5 कोटींनी वाढली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

National Constitution Day : 26 नोव्हेंबरलाच का साजरा करतात संविधान दिवस?

Delhi Crime : देश हादरला ! 350 रुपयांसाठी तरुणाची 60 वेळा चाकू भोसकून हत्या

Shivsena : ‘सगळी तयारी झालीये, 31 डिसेंबरला…’, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचे मोठे विधान

Asia Cup 2023 : आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा

Zero Balance Account : खात्यात पैसे नाहीत? नो टेन्शन आता झिरो बॅलन्स असतानाही बँक देणार पैसे

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!