मुंबई : सर्वांना उत्सुकता लागलेला आयपीएलचा 17 वा हंगाम (IPL 2024) येत्या 22 मार्चपासून सुरू होणार आहे. लोकसभा निवडणुकांमुळे यंदाची आयपीएल दोन विभागात होणार असल्याचे या अगोदरच स्पष्ट करण्यात आले होते. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी याबाबत माहिती दिली आहे. 22 मार्च रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर या सिझनचा पहिला सामना खेळवण्यात येणार आहे.
Planning to start IPL from March 22, says league chairman Arun Dhumal @ThakurArunS #IPL2024
— Press Trust of India (@PTI_News) February 20, 2024
काय म्हणाले अरुण धुमल ?
देशातील लोकसभा निवडणूक आणि आयपीएल 2024 हंगाम एकाचवेळी होणार आहे. त्यामुळे आयपीएलचा हंगाम नेहमीप्रमाणे भारताबाहेर हलवण्यात येईल अशी चर्चा रंगली होती.
मात्र, बीसीसीआय आयपीएल हंगाम भारतातच दोन विभागणीत घेणार असल्याचं समोर आलं आहे. आम्ही याबाबत भारत सरकार आणि क्रिडासह विविध खात्यांसोबत काम करत आहोत. आमचा प्रयत्न हा आयपीएल भारतातच खेळवण्याचा आहे, असं आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी म्हटलं आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Cricketers Retirement : खळबळजनक ! एकाचवेळी ‘या’ 5 क्रिकेटर्सने केली निवृत्तीची घोषणा
HSC Board Exam 2024 : उद्यापासून 12 वीच्या परीक्षेला सुरुवात; शिक्षण मंडळाने आणला ‘हा’ नवीन नियम