मुंबई : येत्या 22 मार्चपासून इंडियन प्रीमियर लीगला (IPL 2024) सुरुवात होणार आहे. आयपीएलचा हा हंगामा सलग दोन महिने सुरु राहणार आहे. यादरम्यान बीसीसीआय आयपीएल हंगामात मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे तुम्हाला भविष्यात आयपीएल तीन महिने पाहता येणार आहे. आयपीएलचा महासंग्राम दोन महिने रंगणार आहे. त्यातच आता आयपीएलच्या आगामी हंगामात सामन्यांची संख्या वाढवण्याची शक्यता आहे. बीसीसीआयकडून 2027 पर्यंतच्या आयपीएल हंगामात 94 सामने खेळवण्यात येतील असे संकेत देण्यात आले आहेत.
आयपीएल 2022 मध्ये एकूण 74 सामने खेळण्यात आले. आतापर्यंतच्या ही सर्वात मोठी संख्या होती. मात्र त्यानंतर 2023 मध्ये ही 74 सामने खेळवण्यात आले. यंदा ही 22 मार्च 2024 पासून सुरु होणारी आयपीएलचे 74 सामने असणार आहेत. असे असतानाही बीसीसीआय प्रत्येक दोन हंगामानंतर आयपीएलच्या सामन्यांमध्ये वाढ करण्याच्या तयारीत आहे.
बीसीसीआयने 2023 आणि 2024 च्या हंगामामध्ये 74 आयपीएल सामने खेळवण्याचा निर्णय घेतला. 2025 आणि 2026 हंगामात 84 सामने होणार आहेत. तर 2027 हंगामात 10 संघांमध्ये 94 सामने होतील. त्यानंतर एक संघ लीग टप्प्यात 18 सामने खेळतील तसेच 4 प्लेऑफसह एकूण 94 सामने होतील. आयपीएलचे 74 सामने 59 दिवसांत होतात, म्हणजेच हे सामने सुमारे 2 महिने चालतात. जर एका मोसमात 94 सामने खेळले गेले तर हा हंगाम सुमारे 75 दिवस म्हणजे अडीच महिने तरी आयपीएलचा सामना चालणार आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Mumbai News : मंत्रालयामध्ये तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून वडापाव विक्रेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न
Imtiyaz Jaleel : इम्तियाज जलील यांना MIM कडून छत्रपती संभाजीनगरमधून दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर
Pune Crime : पुणे पोलिसांची मोठी कारवाई ! इंदापूर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 24 तासांत अटक
Lok Sabha Election 2024 : अखेर ! लोकसभेसाठी ठाकरे गटाचे 16 शिलेदार ठरले
Weather Update : विदर्भाला अवकाळी पावसासह गारपिटीनं झोडपलं; ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी
Chhatrapati Sambhajinagar Crime : सख्खा भाऊ पक्का वैरी! शेतीच्या वादातून भावाने काढला भावाचाच काटा
Ajit Pawar : अजित पवारांना मोठा धक्का ! सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनीदेखील सोडली साथ
Kolhapur Accident : कोल्हापुरमध्ये भीषण अपघात! ट्रकने चिरडल्याने 4 जणांचा मृत्यू
Railway Accident : साबरमती -आगरा सुपरफास्ट एक्स्प्रेसचा भीषण अपघात