Mumbai Indians

Mumbai Indians : ‘या’ कारणांमुळे ‘मुंबई इंडियन्स’ची धुरा रोहितऐवजी पंड्याकडे देण्याचा निर्णय घेतला

740 0

मुंबई : हार्दिक पंड्याची रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) कर्णधारपदी झालेली निवड योग्य आहे की अयोग्य यावरुन क्रिकेट चाहत्यांमध्ये मतमतांतरे आहेत. मात्र मुंबई इंडियन्सच्या प्रशासनाने घेतलेला हा निर्णय आजही क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय आहे. या निर्णयामुळे मुंबई इंडियन्सचे चाहते मोठ्या प्रमाणात नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या होत्या. मात्र खरंच या दोघांपैकी सरस कोण आहे आणि का? याबाबद्दल आज आपण जरा सविस्तर जाणून घेऊया…

इंडियन प्रिमिअर लीग 2024 च्या पर्वाआधी मुंबई इंडियन्सच्या संघाने आपला मागील अनेक वर्षांपासूनचा कर्णधार बदलला.रोहित शर्माला डच्चू देत मुंबई इंडियन्सचं नेतृत्व हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आलं. अनेकांनी रोहितला अशापद्धतीने बाजूला करुन हार्दिकला प्रमोट केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. मात्र पंड्याबद्दलच्या या निर्णयावर अनेकजण फारच वेगाने आणि विचार न करता व्यक्त झाले. मात्र मुंबईने हा निर्णय का घेतला त्याबद्दल जाणून घेऊया…

1) इंडियन प्रिमिअर लीग 2024 च्या आगामी पर्वासाठी रोहितऐवजी हार्दिक पंड्या हा उत्तम पर्याय ठरु शकतो.
2) रोहित शर्मा मागील 10 वर्षांपासून मुंबई इंडियन्सचा कर्णधार होता.
3) नवीन चेहऱ्याला संधी देण्याची हीच योग्य वेळ असल्याने हार्दिक हा सध्या उपलब्ध पर्यायांपैकी सर्वोत्तम आहे यात वाद नाही.
4) खेळाडू म्हणून हार्दिक पंड्याची सरासरी आणि स्ट्राइक रेट हा रोहित शर्मापेक्षा बराच उत्तम आहे.
5) मागील 3 आयपीएल पर्वांमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाला रोहितच्या नेतृत्वात चमकदार कामगिरी करता आली नाही.
6) आता रोहितची जागा घेतल्यानंतर मागील 3 वर्षातील रेकॉर्ड अधिक सुधारण्याचा हार्दिकचा नक्कीच प्रयत्न असेल.
7) हार्दिक पंड्या हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. तो उत्तम फलंदाजी करतो. त्याची गोलंदाजी तर प्रभावशाली आहेच पण त्याचबरोबर तो उत्तम फिल्डरही आहे. कोणत्याही संघाला तो हवाहवासा वाटेल यात शंका नाही.
8) रोहित शर्मा या वर्षी 37 वर्षांचा होणार आहे. तर हार्दिक पंड्या 31 वर्षांचा आहे.
9) मुंबई इंडियन्सच्या संघाने भविष्याचा विचार करुन हार्दिककडे नेतृत्व सोपवलं असेल असं अनेक जाणकारांचं मत आहे. आता हे कितपत खरं आहे हे प्रत्यक्ष मैदानातच समजेल.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात बॅनरबाजी; कष्टाळू कार्यकर्ता कोण?

Nashik News : वाटलं खेळता खेळता बुडाला पण…; नाशिकमधील ‘त्या’ 4 वर्षीय चिमुकल्याच्या मृत्यूचा Video आला समोर

Chandrapur News : चंद्रपुर हळहळलं ! महिलेनं लेकीला विहिरीत ढकललं अन्…

Pune Crime News : सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथे कोयते-तलवारीने 10 ते 15 गुंडांकडून तिघांवर हल्ला

Pune News : पुण्यात नवीन टर्मिनलच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला! ‘या’ तारखेपासून सुरू होणार विमानसेवा

Utkatasana : उत्कटासन म्हणजे काय ? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!