IND vs SA

IND VS SA : वनडे आधी टीम इंडियाला दुसरा धक्का; शमीनंतर ‘हा’ खेळाडू बाहेर

559 0

जोहान्सबर्ग : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट टीम सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर (IND VS SA) आहे. टीम इंडिया आफ्रिकेत तीन टी-20, तीन वन डे व दोन टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. यामधील तीन टी-20 सिरीज संपली आहे. उद्यापासून या दौऱ्यातील वन डे सीरिजला सुरुवात होणार आहे. मात्र या सिरीजपूर्वी टीम इंडियाला डबल धक्का बसला आहे. या सीरिजमधून पेस बॉलर दीपक चहरने आणि फिट नसल्यामुळे मोहम्मद शमीने टेस्ट सीरिजमधून माघार घेतली आहे.

या दोन्ही टीममध्ये 17 डिसेंबर 2023 रोजी पहिली वन डे जोहान्सबर्ग येथे, 19 डिसेंबर 2023 रोजी दुसरी वन डे पोर्ट एलिझाबेथ येथे, 21 डिसेंबर 2023 रोजी तिसरी वन डे पारल येथे होणार आहे. तर, 26 ते 30 डिसेंबर 2023 याकाळात पहिली टेस्ट मॅच सेंच्युरियनला व 3 ते 7 जानेवारी 2024 याकाळात दुसरी टेस्ट मॅच जोहान्सबर्गला होत आहे. या दोन्ही सीरिजपूर्वी दीपक चहर आणि मोहम्मद शमी बाहेर पडल्याने संघाला मोठा धक्का बसला आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये हेड टू हेड झालेल्या मॅचचे रेकॉर्ड पाहता आफ्रिका ही टीम इंडियाच्या वरचढ आहे. आतापर्यंत भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये एकूण 91 वन डे मॅच झाल्या आहेत. त्यापैकी भारत 38 तर दक्षिण आफ्रिकेची टीम 50 मॅच जिंकली आहे. तीन मॅच अनिर्णित राहिल्या. भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये झालेल्या एकूण वन डे मॅच पैकी 37 वन डे दक्षिण आफ्रिकेत झाल्या असून त्यापैकी तब्बल 25 वन डे दक्षिण आफ्रिकेची टीम जिंकली आहे. भारताला दक्षिण आफ्रिकेत केवळ 10 वन डे जिंकता आल्या असून 2 अनिर्णित राहिल्या आहेत.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताची वन डे टीम
ऋरतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव. युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीपसिंग, आकाशदीप.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Anup Ghoshal : बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अनुप घोषाल यांच निधन

Ahmednagar Suicide: खळबळजनक ! मनसे नगरसेवक वसंत मोरेंच्या नावानं चिठ्ठी तरुणाची आत्महत्या

Nagpur Accident : नागपुरात ट्रक आणि कारचा भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू

Ratan Tata : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!