Virat Kohli

Virat Kohli : कोहलीने घेतली ‘विराट’ झेप आयसीसीकडून एकदिवसीय क्रमवारी जाहीर

955 5

मुंबई : आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला. त्यामुळे टीम इंडियाचे (Virat Kohli)  तिसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरण्याचं स्वप्न भंगलं. मात्र तरीदेखील टीम इंडियाने या विश्वचषकात जी कामगिरी केली ती दमदार होती. या विश्वचषकात टीम इंडियातल्या प्रत्येक खेळाडूने दमदार कामगिरी केली.याचाच फायदा टीम इंडियाच्या खेळाडूंना आयसीसी एकदिवसीय क्रमवारीमध्ये झाला आहे. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.

विश्वचषक स्पर्धेत विराट कोहलीच्या (Virat Kohli) बॅटमधून खोऱ्याने धावा निघाल्या. या स्पर्धेत विराटने सर्वाधिक 765 धावा केल्या, याच कामगिरीच्या जोरावर विराटला प्लेअर ऑफ द टूर्नांमेंटचा खिताबही देण्यात आला. याचा फायदा त्याला आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत झाला आहे. आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत विराट कोहली थेट तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.विराटच्या खात्यात 791 पॉईंट जमा झालेत. आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत असलेल्या शुभमन गिलपासून विराट कोहली आता फक्त 35 पॉईंट दूर आहे. गिलच्या खात्यात 826 रेटिंग पॉईंट्स आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तनचा माजी कर्णधार बाबर आझमच्या खात्यात 824 रेटिंग पॉईंट आहेत.

केवळ विराट कोहलीच नाही तर रोहित शर्माही आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत चौथ्या स्थानावर पोहोचलाय. याआधी कर्णधार रोहित शर्मा 739 पॉईंटसह सहाव्या क्रमांकावर होता. तसेच भारतीय गोलंदाजांनादेखील फायदा झाला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज तिसऱ्या तर जसप्रीत बुमराह चौथ्या स्थानावर आहे. चायनामन गोलंदाज कुलदीप यादव सातव्या स्थानावर आहे. तर विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा मोहम्मद शमी दहाव्या स्थानावर आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pankaja Munde : पंकजा मुंडेंचा नवा लूक; Video व्हायरल

Prof. Namdevrao Jadhav : चर्चेतला चेहरा : प्रा. नामदेवराव जाधव

ICC चा मोठा निर्णय ! आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमधील ट्रान्सजेंडर खेळाडूंवर घातली बंदी

ST Bus Accident : चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसचा भीषण अपघात; 6 जण जखमी

Share This News

Comments are closed.

error: Content is protected !!