पुणे: स्पर्धा म्हटली की विजय-पराभव आलाच. मात्र, त्याचा विचार न करता सर्वोत्तम खेळावर भर द्या, असे प्रतिपादन केंद्रिय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधऱ मोहोळ यांनी केले.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतील ‘फिट इंडिया’ संकल्पनेअंतर्गत पुण्यात सुरू असलेल्या ‘सांसद खेल महोत्सव’ अर्थात खासदार क्रीडा महोत्सवातील टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन डेक्कन जिमखाना येथे झाले.
या वेळी बोलताना मोहोळ म्हणाले, मीही एकेकाळी खेळाडू होतो. खेळाडूंना काय आवश्यक असते, याची मला पूर्ण जाण आहे. मात्र, खेळाडूंनी आपल्या सर्वोत्तम खेळाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. सर्वोत्तम खेळ केला, तर यश आपोआप मिळते. पराभवातून शिकून पुढे जायला हवे. आपले काय चुकले, त्याचा विचार करून पुढे ती चूक पुन्हा होणार नाही, यावर मेहनत घेतली पाहिजे. खेळ कुठलाही असो, मेहनतीशिवाय पर्याय नाही.
या उद्घाटनप्रसंगी विविध वयोगटांतील युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग पाहून मोहोळ भारावले. त्यांनी खेळाडूंशी व्यक्तिगत संवाद साधून स्पर्धकांचे मनोबल वाढवले, तसेच अनेक खेळाडूंशी संवाद साधून त्यांच्या अपेक्षा, अडचणी आणि प्रशिक्षणाविषयीच्या गरजा जाणून घेतल्या. त्याचबरोबर अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही दिले. या संपूर्ण स्पर्धेदरम्यान दिसत असलेली तरुणाईची ऊर्जा, शिस्त आणि स्पर्धात्मक भावना ही निश्चितच समाधानाची बाब असल्याचे मोहोळ म्हणाले.
या उद्घाटन प्रसंगी पुणे पोलीस उपायुक्त संदीपजी भाजीभाकरे साहेब, शिवछत्रपती पुरस्कार विजेते सुनील बाबरस, मॉर्डन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. निवेदिता एकबोटे, प्रकाश तुळपुळे, खासदार क्रीडा चषकाचे समन्वयक मनोज एरंडे, शैलेश टिळक, राजीव बोडस, प्रकाश तुळपुळे, श्रीराम कोणेकर, स्मिता बोडस, अजय शिंदे, मोहन उसगावकर, श्रीकांत अंतुरकर, राष्ट्रीय खेळाडू सन्मय परांजपे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते रोहित चौधरी, सुजाता बाबरस, अश्लेषा बोडस, सोनिया देशपांडे, रवींद्र साळेगावकर, सुनील पांडे, शैलेश बडदे, संयोजक किरण ओरसे, सौरभ कुंडलिक, सागर परदेशी, अर्चना सोनवणे, ईश्वर बनपट्टे, अपूर्व सोनटक्के, लताताई धायगुडे, अपर्णा कुऱ्हाडे, अजय दुधाने, हेमंत डाबी, सुजित गोटेकर, प्राजक्ता डांगे, प्रीती शहा, सचिन मानवतकर आदी मान्यवर उपस्थित होते.
ही स्पर्धा १६ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक, मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे. या महोत्सवात एकूण ३५ क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. पुणेकरांना विविध खेळाचा थरार अनुभवण्याची संधी या महोत्सवानिमित्ताने मिळत आहे. विविध वयोगटात शालेय विद्यार्थी, महाविद्यालयातील तरुण, अनुभवी खेळाडू आणि प्रौढ खेळाडूही या स्पर्धांमध्ये आपले कौशल्य दाखवित आहेत.