आयसीसीच्या अध्यक्षपदी जय शहा यांची निवड; आयसीसीच्या अध्यक्षपदी विराजमान होणारे ‘5’वे भारतीय 

341 0

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अर्थात बीसीसीआयचे सचिव जय शहांची आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

‘बीसीसीआय’चे सचिव जय शहाआयसीसीचे अध्यक्ष बनणारे ते सर्वात तरुण भारतीय असतील. जय शहा वयाच्या 36 व्या वर्षी ही जबाबदारी स्वीकारणार आहेत.आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले आहेत. त्यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबरला संपत आहे. बार्कले हे सलग तिसऱ्यांदा अध्यक्ष राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले होते. 2020 पासून ते या पदावर होते. जय शहा 1 डिसेंबरपासून हे पद स्वीकारतील. जय शहा यांच्यापूर्वी भारतातील अनेक दिग्गजांनी आयसीसीचे अध्यक्ष पद भूषवले.जगमोहन दालमिया 1997 ते 2000 पर्यंत आयसीसीचे अध्यक्ष होते. त्यानंतर 2010 ते 2012 पर्यंत शरद पवार होते. तर एन श्रीनिवासन 2014-15 मध्ये होते. तर शशांक मनोहर 2015-2020 पर्यंत अध्यक्ष होते

जय शहांबद्दल बोलायचे झाले तर ते 2019 मध्ये प्रथमच बीसीसीआयचे सचिव झाले. त्यानंतर 2022 मध्ये त्यांनी सलग दुसऱ्यांदा हे पद भूषवले. आयसीसीच्या अध्यक्षपदी जय शाह यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांना 15 सदस्यांनी पाठिंबा दिला होता. जर आपण आयसीसीच्या नियमांवर नजर टाकली तर अध्यक्ष निवडीसाठी 16 संचालक मतदान करतात. अशा स्थितीत 9 मते मिळणे आवश्यक मानले जात आहे. जय शहा यांना 15 सदस्यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे जय शहा हे पुढचे आयसीसी चे अध्यक्ष असतील

आयसीसीच्या अध्यक्षपदी जय शहा यांची निवड; आयसीसीच्या अध्यक्षपदी विराजमान होणारे ‘5’वे भारतीय

Share This News

Related Post

Indonesia Open

Indonesia Open : भारताने घडवला इतिहास ! ‘या’ जोडीने जिंकले इंडोनेशिया ओपनचे पहिले विजेतेपद

Posted by - June 18, 2023 0
भारताचे बॅडमिंटनपटू (Badminton) सात्विक साईराज रंकिरेड्डी (Satwik Sairaj Rankireddy) आणि चिराग शेट्टी (Chirag Shetty) यांनी इंडोनेशिया ओपनचं (Indonesia Open) विजेतेपद…
Rajiv Mishra Death

Rajiv Mishra Death: क्रीडा क्षेत्रात मोठी खळबळ ! हॉकीपटू राजीव मिश्रा यांचा कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

Posted by - June 24, 2023 0
भारताचे माजी ज्युनियर हॉकीपटू राजीव कुमार मिश्रा वाराणसीच्या सरसौली भागात राहत्या घरी गूढ परिस्थितीत मृतावस्थेत (Rajiv Mishra Death) आढळून आले.…

खेलो इंडिया स्पर्धेत यशस्वी खेळाडूंच्या पुरस्कार रकमेत वाढ-क्रीडा मंत्री सुनील केदार

Posted by - May 30, 2022 0
हरियाणा येथे होणाऱ्या चौथ्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत यशस्वी खेळाडूंच्या पुरस्कार रकमेत वाढ करून प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंना ३ लाख, दुसऱ्या…
Ranji Trophy

Ranji Trophy : धोनीच्या ‘या’ हुकमी एक्क्याने 11 व्या नंबरवर फलंदाजीला येऊन ठोकले शतक

Posted by - February 27, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तनुष कोटियन आणि तुषार देशपांडे यांनी रणजी स्पर्धेत (Ranji Trophy) ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मुबईकडून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *