भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेश विश्वविजेता ठरला आहे. दोम्माराजू गुकेश ने १८व्या वर्षी विश्वविजेता होण्याचा बहुमान पटकावला. १८वर्षीय गुकेशने जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत जगज्जेता डिंग लिरेनचं आव्हान मोडून काढत इतिहास घडवला.
सिंगापूरमध्ये जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप पार पडली. या स्पर्धेतील 11 व्या डावात गुकेशने लिरेनला मागे टाकत 6.5 गुणांची कमाई करत जेतेपदाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले होते. पंरतु 12 व्या डावात लिरेनने चतुराई दाखवत बरोबरी साधली. 13 व्या डावात दोघांनीही विजयासाठी प्रयत्न केले परंतु दोघांनाही विजय मिळवता आला नाही. 13 वा डावही बरोबरीत सुटल्यामुळे अजिंक्यपद कोण पटकावणारा याचा फैसला 14 व्या डावावर येऊन ठेपला. 14 व्या डावात डी. गुकेशने कोणतीही चुक न करता बाजी मारली आणि जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद पटकावले.