क्रिकेटर ऋषभ पंतच्या गाडीला भीषण अपघात; रुग्णालयात उपचार सुरू

1705 0

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू ऋषभ पंत याच्या कारला भीषण अपघात झाला. दिल्लीहून घरी जात असताना रुडकीच्या नारसन बॉर्डरवर हम्मदपूर येथे हा अपघात झाला. ऋषभची कार दुभाजकास धडकल्यानंतर कारने पेट घेतला. सुदैवानं या अपघातातून ऋषभ बचावला. त्याला दिल्लीच्या रुग्णालयात तातडीने दाखल केले असून त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार आहे.

Share This News
error: Content is protected !!