शिवम शेट्टी व पुनीत बालन ग्रुप यांच्यात सहकार्य करार

209 0

पुणे :माउंट एव्हरेस्ट G2 तायक्वांदो स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा तरुण खेळाडू शिवम शेट्टी याच्या समवेत ‘पुनीत बालन ग्रुप’च्यावतीने सहकार्य करार करण्यात आला आहे. ग्रुपचे अध्यक्ष व युवा उद्योजक पुनीत बालन यांनी ही माहिती दिली.

शिवम शेट्टी हा इंडिया रँक-१ चा तायक्वांदो खेळाडू आहे. त्याने नुकतेच माऊंट एव्हरेस्ट G2 तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करून भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. शेट्टी यांनी आत्तापर्यंत एकूण 13 राष्ट्रीय पदके आणि तीन आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत. या तरुण खेळाडूचे आगामी काळात तायक्वांदो जागतिक चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरण्याचे आणि आशियाई खेळांमध्ये भाग घेऊन जागतिक क्रमवारीत स्थान मिळविण्याचे उद्दिष्ट आहे.

आता पुनीत बालन ग्रुपच्याबरोबर सहकार्य करार झाल्याने शिवमला भविष्यातील उद्दिष्टे गाठण्यासाठी खेळाचे साहित्य, प्रशिक्षक, आहार आदी मदत आणि सहकार्य मिळणार आहे.

शिवम शेट्टी हा तायक्वांदो खेळातील भारताचा क्र. 1 चा खेळाडू आहे. अनेकदा गुणवंत खेळाडूना केवळ परिस्थितीमुळे खेळापासून दूर रहावे लागते. केवळ आर्थिक कारणामुळे खेळाडू खेळांपासून दूर जाऊ नयेत यासाठी पुणे बालन ग्रुपच्या माध्यमातून त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आमचे कायमच प्रयत्न असतात शिवम सारख्या गुणवंत खेळाडूशी आम्ही जोडले गेलो याचाही आनंद मला निश्चितपणे आहे. असं मत युवा उद्योजक पुनीत बालन यांनी व्यक्त केलं

Share This News
error: Content is protected !!