मुंबई : भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू अजित आगरकर (Ajit Agarkar) याची भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समिती अध्यक्षपदी निवड झाली आहे. बीसीसीआयने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. अजित आगरकर (Ajit Agarkar) याने याआधी मुंबई संघाच्या निवड समितीचे अध्यक्षपदही भूषावले आहे. त्याशिवाय तो आयपीएलमध्ये दिल्ली संघाचा गोलंदाजी कोच होता. निवड समितीसाठी आलेल्या अर्जदारामध्ये अजित आगरकर याचा अनुभव सर्वात जास्त होता. त्यामुळे त्याची निवड करण्यात आल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे.
🚨 NEWS 🚨: Ajit Agarkar appointed Chairman of Senior Men’s Selection Committee.
Details 🔽https://t.co/paprb6eyJC
— BCCI (@BCCI) July 4, 2023
अजित आगरकर यांची कारकीर्द
45 वर्षीय अजित आगरकर हा रमाकांत आचरेकर यांचा शिष्य राहिला आहे. अजित आगरकर याने 26 कसोटी सामन्यात 59 विकेट घेतल्या आहेत. तर 191 एकदिवसीय सामन्यात 288 विकेट घेतल्या आहेत. या व्यतिरिक्त 4 टी 20 सामन्यात तीन विकेट घेतल्या आहेत. 42 आयपीएल सामन्यात 29 विकेट घेतल्या आहेत.तसेच कसोटीमध्ये अजित आगरकर याने 571 धावा केल्या आहेत. 191 वनडेमध्ये 1269 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याने दिल्ली कॅपिटल्स संघासोबत गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे.
एकदिवसीय सामन्यात सर्वात वेगवान अर्धशतक झळकावण्याचा विक्रम अद्यापही अजित आगरकर (Ajit Agarkar) याच्या नावावर आहे. त्याने 21 चेंडूत अर्धशशतक झळकावले आहे. त्याशिवाय वनडेमध्ये सर्वात वेगवान 50 विकेट घेण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे. 23 एकदिवसीय सामन्यात आगरकर याने 50 विकेट घेतल्या आहेत. अजित आगरकर निवड समितीचा अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहे. तर शिवसुंदर दास, सुब्रतो बॅनर्जी, सलील अंकोला श्रीधरन श्रीनाथ हे निवड समितीचे सदस्य असतील.