Top News Marathi Logo

भारताची ऐतिहासिक कामगिरी; भारताने टी-२० क्रिकेटमध्ये रचला वर्ल्ड रेकॉर्ड!

1857 0

भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची चार सामन्यांची टी-20 मालिका जिंकली आणि त्यात एक नवीन इतिहास रचला! 

भारताने टी-20 क्रिकेटमध्ये एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांच्या शतकांच्या जोरावर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केवळ 1 विकेट गमावत 283 धावांचा नवा विक्रम उभारला. या दोघांनी 210 धावांची विक्रमी भागीदारी रचली, जी टी-20 इतिहासातील सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे.

संजू सॅमसन आणि तिलक वर्माची कामगीरी

संजू सॅमसनने 2024 मध्ये त्याच्या टी-20 कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावले आणि एकाच वर्षात 3 शतकं करणारा तो पहिला फलंदाज ठरला. तसेच, संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी एकाच मालिकेत दोन शतकं केली. तिलक वर्मा, जो आपल्या टी-20 कारकिर्दीतील दुसऱ्या शतकावर होता, त्याने अवघ्या 41 चेंडूत शतक पूर्ण केले. यासोबतच, भारताने एकाच सामन्यात 23 षटकार ठोकले, जो एक नवा विक्रम आहे.

भारताची ऐतिहासिक कामगिरी

• संजू सॅमसन एकाच वर्षात आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 3 शतकं करणारा पहिला फलंदाज ठरला.

• संजू सॅमसन एकाच मालिकेत दोन शतकं करणारा भारताचा पहिला फलंदाज ठरला.

• सलग दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतकं करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला.

• तिलक वर्माने 41 चेंडूत शतक पूर्ण केले, जे भारतासाठी या फॉरमॅटमधील तिसरे जलद शतक आहे.

• भारताने 23 षटकार ठोकले, जो टी-20 क्रिकेटमधील एक नवा विक्रम आहे.

• संजू आणि तिलक यांची 210 धावांची भागीदारी टी-20 आंतरराष्ट्रीय इतिहासातील सर्वात मोठी भागीदारी ठरली.

भारताने 283 धावा केल्या आहेत, जे दोन देशांमध्ये झालेल्या टी-20 सामन्यांमधील दुसरी सर्वात जास्त धावा  आहेत. याशिवाय, संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी मिळून एकाच मालिकेत 4 शतकं केली आहेत, आणि हे टी-20 क्रिकेटमधलं एक नवं विक्रम आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide