ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारीच का साजरा करतात मैत्री दिन ?

422 0

आज ऑगस्ट महिन्याच्या पहिला रविवार फ्रेंडशिप डे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारीच का फ्रेंडशिप डे का साजरा करतात असा प्रश्न तुम्हालाही पडलाय तर वाचा हे कारण 

पहिला फ्रेंडशिप डे कधी साजरा करण्यात आला होता?

1935 मध्ये पहिल्यांदा फ्रेंडशिप डे साजरा करण्यात आला. हा दिवस अमेरिकेत ऑगस्ट महिन्यात साजरा करण्यात आला. मैत्रीचे प्रतीक म्हणून फ्रेंडशिप डे साजरा केला जाऊ लागला, त्यानंतर हा दिवस जगभरात फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जाऊ लागला.

फ्रेंडशिप डे साजरा करण्यामागे एक गोष्ट सांगण्यात येते. अमेरिकेत 1935 मध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारी एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. या हत्येमागे अमेरिकन सरकारचा हात असल्याची चर्चा होती. मृत व्यक्तीचा एक प्रिय मित्र होता. जेव्हा त्याला त्याच्या मित्राच्या मृत्यूची बातमी मिळाली तेव्हा तो खूप निराश झाला. मित्र गमावल्यामुळे त्या व्यक्तीनेही आत्महत्या केली. मैत्रीचे हे रूप पाहून अमेरिकन सरकारने ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार फ्रेंडशिप डे म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. हळूहळू हा दिवस प्रचलित झाला आणि भारतासह इतर अनेक देशांमध्ये ऑगस्टचा पहिला रविवार फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जाऊ लागला.

Share This News
error: Content is protected !!