प्रसिद्ध स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा हा पुन्हा एकदा वादग्रस्त कन्टेन्ट प्रकरणी चर्चेत आला आहे. कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सादर केलेल्या एका गीतामुळे ज्यामुळे शिंदे समर्थकांच्या भावना दुखावल्यात. कामरावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते आहे. मात्र कुणाल कामरा हा वादग्रस्त प्रकरणात पहिल्यांदाच अडकलेला नाही. याआधीही त्याने केलेल्या राजकीय टिपण्यांमुळे तो अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्यामुळे राजकारण्यांना डिवचून चर्चेत येणारा कुणाल कामरा आहे तरी कोण पाहूया..
कुणाल कामरा हा भारतातील एक प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. त्याने त्याच्या करिअरची सुरुवात जाहिरात क्षेत्रातून केली, सुरुवातीपासूनच त्याला कॉमेडी मध्ये करिअर करायचं होतं. 2013 मध्ये त्याने स्टँडअप कॉमेडी करायला सुरुवात केली. तेव्हापासून तो राजकीय नेत्यांवर आणि राजकारणावर तिखट शब्दात पण हास्यास्पद पद्धतीने कॉमेडी करताना दिसतो. सत्ताधारी नेते, पक्ष यांच्यावर थेटपणे टिकात्मक विनोद केल्यामुळे तो अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. 2020 मध्ये त्याने सर्वोच्च न्यायालय आणि न्यायाधीशांवर टीका करणारी ट्विट्स केल्यामुळे त्याच्याविरुद्ध अवमानाचा खटला दाखल झाला होता. त्याबरोबरच पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यासोबत त्याचे विमानात वाद झाले होते. त्यानंतर काही विमान कंपन्यांनी प्रवासबंदी घातली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात केलेल्या विनोदांसाठी त्याने ट्रोलिंगचा सामना केला आहे. याचा थेट परिणाम त्याच्या स्टॅंडअप कॉमेडियन म्हणून त्याच्या करिअरवरही झाला. अनेकदा त्याच्या वक्तव्यांसाठी त्याने माफी मागावी अशी मागणी केली गेली. मात्र कामराने आपल्या मतांवर ठाम राहण्याची भूमिका घेतल्याचं पहायला मिळालं आहे. त्यामुळेच एक बंडखोर कॉमेडियन म्हणून तो ओळखला जातो. स्टँड अप कॉमेडी व्यतिरिक्त त्याचा एक युट्युब चॅनेल असून त्याच्यावर 23 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. या चॅनलवर तो अनेक राजकीय मुद्द्यांवर व्यंगात्मक टिपण्या करताना आणि मुलाखती घेत नाही दिसतो. आणि एकनाथ शिंदे यांच्यावर सादर केलेल्या कवितेमुळे कुणाल कामरा पुन्हा एकदा अडचणीत आला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय आणि त्यानंतर झालेल्या घडामोडींवर एक कविता सादर केली. ज्यामध्ये शिंदेंचा उल्लेख गद्दार असा करण्यात आला. हे पाहून शिंदे समर्थकांच्या भावना दुखावल्या आणि शिवसैनिकांनी कामराचा स्टुडिओ हि फोडला. कामरा विरोधात होता गुन्हाही दाखल झाला असून त्याच्या अटकेची मागणी सत्ताधाऱ्यांकडून केली जात आहे. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून त्याची पाठराखणही केली जात आहे. तर सोशल मीडियावरही कुणाल कामरा सपोर्टर्स विरुद्ध कामरा हेटर्स अशी खडाजंगी सुरू आहे.