निवडणुकीत अनामत रक्कम जप्त होणं म्हणजे काय ? (व्हिडीओ)

113 0

‘या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं…’ ‘या उमेदवाराला आपली अनामत रक्कम वाचवता आली नाही…’ निवडणूक निकालाच्या दिवशी अशी वाक्ये वाचायला किंवा ऐकायला सर्रास मिळतात. पण डिपॉझिट जप्त होणं म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे का ?

कुठलीही निवडणूक लढण्यासाठी उमेदवाराला एक ठराविक रक्कम निवडणूक आयोगाकडे जमा करावी लागते. त्याच रकमेला डिपॉझिट म्हटले जाते. जर कुठल्याही उमेदवाराला ठराविक मते मिळाली नाही, तर त्यांची अनामत रक्कम म्हणजे डिपॉझिट जप्त केली जातात

डिपॉझिटची रक्कम प्रत्येक निवडणुकीसाठी वेगवेगळी असते. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपर्यंत उमेदवाराला अनामत रक्कम जमा करावी लागते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या डिपॉझिटच्या रकमेचा उल्लेख हा रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पीपल्स अॅक्ट १९५१ मध्ये आहे. तर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या अनामत रकमेचा उल्लेख प्रेसिडेंट अँड व्हाईस प्रेसिडेंट इलेक्शन अॅक्ट १९५२ मध्ये करण्यात आला आहे.

लोकसभा आणि विधानसबा निवडणुकीमध्ये सामान आणि एससी-एसटी वर्गातील उमेदवारांसाठी वेगवेगळी अनामत रक्कम निश्चित केलेली आहे. तर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी सर्व वर्गातील उमेदवारांसाठीत सारखीच अनामत रक्कम निश्चित केलेली असते.लोकसभा निवडणुकीत सामान्य वर्गातील उमेदवाराला २५ हजार तर एससी-एसटी वर्गातील उमेदवारांना १२ हजार ५०० रुपये डिपॉझिट रक्कम जमा करावी लागते. तर विधानसभा निवडणुकीती सामान्य वर्गातील उमेदवारांना १० हजार आणि एससीएसटी वर्गातील उमेदवारांनी ५ हजार रुपये जमा करावे लागतात. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी सर्व वर्गातील उमेदवारांना १५ हजार रुपये डिपॉझिट जमा करावी लागते.

अनामत रक्कम केव्हा जप्त होते

निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार जर कुठल्याही उमेदवाराला त्या जागेवर पडलेल्या एकूण मतांपैकी १/६ म्हणजेच १६.६६ टक्के मते मिळाली नाहीत तर त्यांची अनामत रक्कम जप्त केली जाते. – जर कुठल्याही जागेवर १ लाख मते पडली आणि तिथे पाच उमेदवारांना १६ हजार ६६६ पेक्षा कमी मते मिळाती तर त्या सर्वांची अनामत रक्कम जप्त केली जाते. – हा फॉर्म्युला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीमध्येही लागू होतो. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना आपले डिपॉझिट वाचवण्यासाठी १/६ मते मिळवण्याची आवश्यकता असते.

अनामत रक्कम परत केव्हा मिळते

उमेदवाराला जेव्हा एकूण मतदानाच्या १/६ टक्क्यांपेक्षा मते मिळतात. तेव्हा त्यांची डिपॉझिट रक्कम परत केली जाते.- जिंकणाऱ्या उमेदवरालाही त्याची डिपॉझिट रक्कम परत दिली जाते. त्याला १/६ टक्क्यांहून कमी मते मिळाली तरी ही रक्कम परत केली जाते. – मतदान सुरू होणयापूर्वी जर कुठल्याही उमेदवाराचा मृत्यू झाला तर त्याच्या नातेवाईकांना अनामत रक्कम परत केली जाते. – उमेदवाराचं नामांकन रद्द झाल्यावर किंवा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यावर डिपॉझिट रक्कम परत केली जाते.

Share This News

Related Post

Basavaraj Bommai

भाजपच्या महत्वाच्या बैठकीमध्ये अचानक झाली ‘त्याची’ एन्ट्री; आणि मग….. (Video)

Posted by - May 13, 2023 0
बंगळुरू : कर्नाटकमध्ये 10 मे रोजी मतदान पार पडले होते. यानंतर आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यामध्ये सध्या कर्नाटकच्या…

आजपासून बँका सुरू होण्याची वेळ बदलली, हे नवे वेळापत्रक

Posted by - April 18, 2022 0
नवी दिल्ली- भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकेच्या ग्राहकांना एक मोठी भेट दिली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने रविवारी बँकिंगच्या वेळेतही बदल केला…

दिवाळी स्पेशलमध्ये आज पाहूयात खमंग कुरकुरीत ‘शेव रेसिपी’

Posted by - October 11, 2022 0
दिवाळीमध्ये गोड, तिखट फराळाचा आस्वाद घेताना त्यामध्ये शेव तर असायलाच हवी. या शेवेमध्ये देखील अनेकांचे आवडीचे प्रकार देखील असतात. जसे…

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांची तडकाफडकी बदली

Posted by - July 6, 2023 0
पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनातील अत्यंत कार्यक्षम अधिकारी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांची तडकाफडकी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे राज्याच्या सत्ता…
Raiway Fire

Raiway Fire : दौंड स्थानकावर रेल्वेच्या बोगीला आग; Video आला समोर

Posted by - July 17, 2023 0
पुणे : पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये दौंड रेल्वे स्थानकाच्या (Raiway Fire) प्लॅटफॉर्म क्रमांक सहाच्या बाजूला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *