Trending Tree

Trending Tree : 150 वर्षांच्या जुन्या झाडातून गेल्या 20 वर्षांपासून वाहत आहे पाणी; नेमकी काय आहे यामागची ‘INSIDE STORY’ ?

604 0

निसर्गातील प्रत्येक झाडाची (Trending Tree) काही खास वैशिष्ट्ये आहेत. या खास वैशिष्ट्यांमुळे त्याला झाडाला एक वेगळीच शोभा येत असते. काही झाडे फळे, तर काही फुले, तर काही औषधी वनस्पतींचा पुरवठा करतात. सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता कि एका जुन्या झाडाच्या खोडामधून पाणी वाहताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. चला तर मग आज आपण जाणून घेऊया यामागची ‘INSIDE STORY काय आहे ?

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये बऱ्याच वर्षांपासून एका झाडातून चक्क पाणी येत आहे. मॉन्टेनेग्रोमधील डिनोसा गावात 150 वर्षांपूर्वीचे एक झाड आहे. विशेष बाब म्हणजे 1990 च्या दशकापासून या झाडातून पाणी वाहते आहे. तसेच मुसळधार पाऊस पडला की, या झाडातून पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू होतो. तसेच हे केवळ एक-दोन वर्षांपासून नाही, तर 20 ते 25 वर्षांपासून घडत आहे. हा व्हिडिओ तुम्ही एकदा पहाच तुम्हालादेखील आश्चर्य वाटेल.

150 वर्षे जुन्या असणाऱ्या या झाडाच्या परिसरात अनेक भूमिगत झरे आहेत. जेव्हा मुसळधार पाऊस पडतो, तेव्हा हे झरे ओसंडून वाहतात. तसेच अतिरिक्त दाबामुळे हे पाणी झाडाच्या पोकळ खोडातूनही वाहू लागते. बऱ्याचदा दाब इतका जास्त असतो की, हे पाणी अतिशय वेगात झाडामधून येऊ लागते. तसेच हे 20-25 वर्षांपासून घडते आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोक यावर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Buldhana News : इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे बुलढाण्याच्या बोरी अडगावमध्ये तणावपूर्ण वातावरण

Buldhana Accident : बुलढाणा हळहळलं ! आई आणि मुलीची ‘ती’ भेट ठरली अखेरची

Yerwada Jail : कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा जेलमधून फरार; कारागृहाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

Navi Mumbai Video : मालकाचा नंबर दिला नाही म्हणून तरुणाने तलवार घेऊन पसरवली दहशत

Share This News

Related Post

दत्तात्रेय जयंती 2022 : श्री दत्तजयंतीचे महत्व, दत्तात्रेय बीज मंत्र, गुरुचरित्र वाचन सप्ताह समाप्ती, पौर्णिमा तिथी वाचा सविस्तर माहिती

Posted by - December 7, 2022 0
दत्तात्रेय जयंती 2022 : दत्तजयंती ही हिंदू पंचांगात असलेल्या मार्गशीर्ष पौर्णिमा या तिथीला साजरी केली जाते. हा दिवस म्हणजे भगवान दतात्रेय…

गुगलची नवीन घोषणा तुमच्यासाठी महत्वाची आहे, जाणून घ्या

Posted by - May 2, 2022 0
नवी दिल्ली,- गुगलने नवी मोठी घोषणा केली आहे. गुगल सर्चमधून फोन नंबर, ईमेल, अॅड्रेस हटवण्यासाठी परवानगी दिली आहे. लोकांच्या संवेदनशील…
Mumbai Local Video

Mumbai Local Video : पुरुषांपेक्षा बायका परवडल्या; लोकमधील 2 व्यक्तींमधला राडा तुफान व्हायरल

Posted by - August 18, 2023 0
मुंबई लोकल म्हटल्यावर (Mumbai Local Video) तुम्हाला आठवते ते प्रचंड गर्दी प्रवासादरम्यान अनेक वेळा सीटवरून प्रवाशांमध्ये वाद (Mumbai Local Video)…
Supriya Sule

Supriya Sule : अजित पवारांना पाहून सुप्रिया सुळेंच्या डोळ्यात आलं पाणी

Posted by - September 11, 2023 0
गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर छोट्या पडद्यावरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाची चर्चा आहे. या शोचा तिसरा सीझन आपल्याला पाहायला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *