Pune Ganpati

आज संकष्टी चतुर्थी; अशी करा गणपती बाप्पाची पूजा

2596 0

संकष्टी चतुर्थी दरवर्षी अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. पंचागानुसार या वर्षी संकष्टी चतुर्थी 2 ऑक्टोबरला म्हणजेच आज साजरी केली जात आहे. या दिवशी विधीनुसार गणपती बाप्पाची पूजा करून उपवास केला जातो. धार्मिक श्रद्धेनुसार असे केल्याने विघ्नहर्ता आपल्या भक्तांचे सर्व संकट दूर होतात अशी धारणा आहे. संकष्टी चतुर्थी तिथी 2 ऑक्टोबरपासून म्हणजेच आज सकाळी 07:36 वाजता सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 06:11 वाजता समाप्त होईल.

अशी करा गणपती बाप्पाची पूजा

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून हातात पाणी घेऊन उपवासाचा संकल्प करा

आता एक स्वच्छ लाकडी स्टूल घेऊन त्यावर स्वच्छ कापड पसरून श्रीगणेशाची मूर्ती स्थापित करा.

श्रीगणेशाला पाण्याने आंघोळ घाला, पवित्र धागा अर्पण करा, वस्त्रे घाला, अत्तर लावा, फुलांच्या माळा आणि अगरबत्ती लावा.यानंतर गणेशाला दुर्वा अर्पण करा.

आता नारळ आणि केळी अर्पण करा. याशिवाय भोग म्हणून मोदक आणि लाडूही देऊ शकता.

यानंतर डोळे बंद करून श्रीगणेशासमोर हात जोडून त्यांच्या मंत्रांचा जप करा.

कुंडलीत राहू-केतू अशुभ असल्यास मानसिक तणाव, आर्थिक नुकसान आणि कुटुंबात कलह वाढतो, असं म्हणतात. म्हणून संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेशाला दुर्वाच्या 21 जोड्या अर्पण केल्यास राहुमुळे होणारे दोष दूर होता, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. त्याशिवाय गरजू व्यक्तीला हिरवा मूग दान करा. तसंच गणेश मंदिरात तुमच्या क्षमतेनुसार वस्तू दान करा. ‘श्री गं गणपतये नमः’ चा जप केल्यानेही लाभ होतो.

Share This News
error: Content is protected !!