मुंबईबाबत(MUMBAI) केलेल्या वक्तव्यामुळे तामिळनाडू भाजपचे (BJP)नेते के. अण्णामलाई (ANNAMALAI)चांगलेच अडचणीत आले आहेत. मुंबई ही महाराष्ट्राची नसून एक आंतरराष्ट्रीय शहर असल्याचा दावा अण्णामलाई(ANNAMALAI)यांनी केल्यानंतर, राज्याच्या राजकारणात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विशेषतः ठाकरे बंधूंनी या वक्तव्यावरून भाजपवर (BJP )जोरदार हल्लाबोल केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे(MNS)अध्यक्ष राज ठाकरे(RAJ THACKAREY)यांनी अण्णामलाई यांचा समाचार घेताना, “कोण हा रसमलाई, जो मुंबई(MUMBAI) महाराष्ट्राची नाही असं म्हणतो?” अशा उपरोधिक शब्दांत नाराजी व्यक्त केली. मुंबई आणि महाराष्ट्राच्या संबंधावर बोलण्याचा अधिकार अण्णामलाई यांना काय , असा सवाल करत राज ठाकरे यांनी भाजपमधील काही नेत्यांच्या भूमिकांवरही टीकेची झोड उठवली. कृपाशंकर सिंग यांच्या उत्तर भारतीय महापौराच्या वक्तव्याचा उल्लेख करत, ही भूमिका महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का देणारी असल्याचे ते म्हणाले
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी(UDHAV THACKAREY)अण्णामलाई यांच्यावर निशाणा साधला. “अण्णामलाई(ANNAMALAI)यांनी नकळतपणे भाजपच्या(BJP)मनातलं काळं बाहेर काढलं आहे,” असे म्हणत त्यांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. मुंबईच्या अस्मितेचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत, ठाकरे बंधूंनी या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादाला अधिक धार दिली आहे. अण्णामलाई यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आले आहे.