रशिया VS युक्रेन : रशियाने घातक व्हॅक्यूम बॉम्ब युक्रेनवर टाकला ? व्हॅक्यूम बॉम्ब किती घातक आहे जाणून घ्या

333 0

रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचत चालला आहे. रशियाकडून व्हॅक्यूम बॉम्ब हल्ला करण्यात आल्याचा दावा युक्रनेकडून करण्यात येत आहे.युक्रेनच्या सैन्याकडून रशियन फौजांचा कडवा प्रतिकार सुरू आहे. युक्रेनच्या राजदूतांनी अमेरिकेत हा आरोप केला आहे. रशियाने युक्रेनमध्ये आता क्लस्टर बॉम्ब आणि व्हॅक्यूम बॉम्बचा वापर करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने या बॉम्बचा वापर करण्यास बंदी घातली आहे.

रशिया आणि युक्रेन दरम्यान युद्ध सुरू असताना दुसऱ्या बाजूला रशिया आणि युक्रेनमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.रशियाकडून युक्रेनवर बॉम्ब हल्ले सुरू आहेत. युक्रेनच्या सैन्याचा प्रतिकार मोडून काढण्यासाठी रशियाने आता सर्व संकेत पायदळी तुडवण्यास सुरुवात केली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे नागरिकांनी आश्रय घेतलेल्या एका शाळेवर या खतरनाक बॉम्बचा वापर केला असल्याचा दावा ॲमेस्टी इंटरनॅशनल आणि ह्युमन राइट्स वॉच या संस्थेने केला आहे.

व्हॅक्यूम बॉम्ब किती घातक आहे ?

फादर ऑफ ऑल बॉम्ब अर्थात व्हॅक्यूम बॉम्ब हा 300 मीटर पर्यंतच्या परिसराला नुकसान पोहोचवू शकतो. विध्वंसक शस्त्रे एका जेटमधून खाली टाकली जातात आणि हवेत असतानाच त्याचा स्फोट होतो.व्हॅक्यूम बॉम्बला थर्मोबॅरिक अस्त्र म्हणून ओळखले जाते. व्हॅक्यूम बॉम्बचा स्फोट झाल्यानंतर हवेतील ऑक्सिजन शोषून घेतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण करणारा स्फोट होतो. हा स्फोट इतर बॉम्बच्या तुलनेत भीषण असतो. या बॉम्बच्या स्फोटाने मानवी शरीराची वाफ होऊ शकते. व्हॅक्यूम बॉम्ब हा बिगर अण्वस्त्र शस्त्रांमधील सर्वात धोकादायक बॉम्बपैकी एक आहे.

क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय ?

क्लस्टर बॉम्ब म्हणजे अनेक बॉम्बचा एक गुच्छा असतो. लढाऊ विमानांच्या मदतीने हे बॉम्ब हल्ले केले जातात. हे बॉम्ब ज्या ठिकाणी पडतात, त्या भागातील 25 ते 30 मीटर परिघात मोठ्या प्रमाणावर विद्वंस होतो.
व्हॅक्यूम बॉम्बचा वापर शत्रू देशांच्या सैनिकांवर, त्यांच्या ठिकाणांवर केला जातो. सामान्य नागरिकांवर याचा वापर करणे हा युद्ध अपराध समजला जातो.

Share This News

Related Post

Delhi News

Delhi News : ट्रेडमिलवर धावताना शॉक लागून इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - July 20, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीमध्ये (Delhi News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये व्यायाम करताना ट्रेडमिलवर धावताना शॉक…

प्रभासचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘राधे श्याम’ आजपासून प्रेक्षकांच्या भेटीस, पाहा ट्रेलर (व्हिडिओ )

Posted by - March 11, 2022 0
मुंबई- अभिनेता प्रभासचा ‘राधे श्याम’ हा चित्रपट आज म्हणजेच 11 मार्च रोजी थिएटरमध्ये दाखल होत आहे. या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून…
Viral Video

Viral Video : खतरनाक ! पिसाळलेल्या बैलाने घरात घुसून महिलांना उडवले

Posted by - November 30, 2023 0
आजकाल सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होताना दिसत आहेत. यामध्ये काही हसवणारे, काही रडवणारे तर काही धक्कादायक असतात.…
Crime News

Crime News : हिंदुस्तान जिंदाबादच्या घोषणा देणे पडले महागात; टोळक्याकडून तरुणाची निर्घृणपणे हत्या

Posted by - September 17, 2023 0
बॉलीवूड अभिनेता सनी देओलचा गदर-2 या चित्रपटला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. देशात अनेक राज्यात या चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल आहेत.…
Noida

नोएडामध्ये फॅशन शोदरम्यान मोठी दुर्घटना; लोखंडी खांब अंगावर पडून 24 वर्षीय मॉडेलचा जागीच मृत्यू

Posted by - June 12, 2023 0
नोएडा : नोएडातील (Noida) सेक्टर-16ए पोलीस स्टेशन हद्दीतील फिल्मसिटीमध्ये (Film City) असलेल्या लक्ष्मी स्टुडिओमध्ये फॅशन शो (Fashion Show) सुरु असताना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *