LETTER TO PRATAP SARNAIK: अहो 'एश्टीवालं' मंत्री... ह्ये बी पत्र वाचा की राव!; प्रवासी आमचं दैवत, पण'एश्टी'कडं नाय बघवत

LETTER TO PRATAP SARNAIK: अहो ‘एश्टीवालं’ मंत्री… ह्ये बी पत्र वाचा की राव!; प्रवासी आमचं दैवत, पण’एश्टी’कडं नाय बघवत

263 0

LETTER TO PRATAP SARNAIK

प्रति,

प्रताप सरनाईक,
परिवहन मंत्री,
महाराष्ट्र राज्य

आदरणीय साहेब
जय महाराष्ट्र!

साहेब 15 डिसेंबर 2024 रोजी तुम्ही मंत्री झालात. सामान्य घरात जन्मलेला, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला नेता राज्याचा मंत्री (MINISTER) झाला याचा मनापासून आनंद झाला साहेब! तुमच्याकडे परिवहन मंत्री पदाची (TRANSPORT MINISTER) जबाबदारी आल्यानंतर तुम्ही प्रत्यक्ष आगारात जाऊन पाहणी करत होतात, स्वतः एसटी मधून प्रवास करत होतात, प्रवाशांशी बोलून त्यांच्या व्यथा जाणून घेत होतात. हे सगळं दृश्य पाहून वाटलं होतं एसटीचं रुतलेलं चाक आता वर येईल आणि तुमची आमची सर्वसामान्यांची एसटी गावखेड्यातून शहरापर्यंत सुसाट जाईल! असो…!

VIDEO: प्रवासी आमचं दैवत, पण’एश्टी’कडं नाय बघवत ! PRATAP SARNAIK | ST|

साहेब आज तुम्हाला पत्र लिहिण्यामागचं कारण थोडं वेगळं आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तुम्ही लिहिलेलं तीन पानी पत्र वाचले मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित मेळाव्यावर तुम्ही तुमच्या पक्षनेतृत्वाकडे पत्र लिहून व्यक्त झालात, तुमचा तो अधिकारही आहे साहेब पण राज्यातल्या एसटी बसच्या दुरवस्थेबद्दल तुम्ही कधी बोलणार साहेब? लाखो प्रवासी दररोज आपला जीव धोक्यात घालून एसटी बसमधून प्रवास करतात. पावसाळ्या अक्षरशः गळकं छत, तुटलेली
बाकडी यावर बसून प्रवास करतात.

साहेब तुम्ही परिवहन मंत्री झालात एसटीच्या 45 वर्षाच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढत परिवहन मंडळाची स्थिती तुम्ही मांडलीत आणि पुढील दोन वर्षात एसटी महामंडळाचा चेहरा मोहरा बदलू, असा शब्दही साहेब राजकारणातून डोकं वर काढून तुम्ही म्हटल्याप्रमाणे एसटी महामंडळाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी खरंच प्रयत्न कराल का हो? वेळी अवेळी सुटणाऱ्या एसटी बसेसमुळे कामाच्या ठिकाणी, तसेच शाळांमध्ये जाताना विद्यार्थ्यांना होणारा मनस्ताप तुम्ही समजून घ्याल का हो…?

Pratap Sarnaik letter: ठाकरे बंधूंवर टीका करत प्रताप सरनाईकांचं शिंदेंना पत्र;पत्रात काय ?

साहेब तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत हो! त्या तुम्ही पूर्ण कराल असा विश्वास देखील आहे साहेब! इतर राजकारण्यांप्रमाणे तुम्ही केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष कृती कराल आणि एसटी महामंडळाची सेवा सुधाराल अशी अपेक्षा!

साहेब एक सांगू का हो?

प्रवासी आमचं दैवत, पण’एश्टी’कडं नाय बघवत !

 

आपला
एसटी प्रवासी
संकेत देशपांडे

(सासवड, ता. पुरंदर, जि.पुणे)

TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT ON BRS : बसवायला राजकीय बस्तान निवडलं तीर्थस्थान

TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT : शिंदेचे खासदार असलेल्या जागेवर भाजपाचा डोळा

हीच का महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ?

 

Share This News
error: Content is protected !!