पूजेमध्ये कापराच्या वड्यांचं काय महत्व आहे जाणुन घ्या

237 0

हिंदू धर्मामध्ये पूजेच्या ताटात कापूर हा असतोच.कुठलीही पूजा असो किंवा होम हवन असो कापुराशिवाय आरती पूर्ण होतच नाही.पूजेनंतर कापुराची आरती सर्वाना दिली जाते. कापूराला वास्तुशास्त्रामध्ये खूप महत्व दिले आहे. घरात कापूर असल्याचे फायदे खालीलप्रमाणे आहेत.

वातावरण राहते शुद्ध

घरात पूजेदरम्यान कापूर लावल्याने एक शुद्ध वातावरण निर्माण होते. कापूरच्या वासाने मन सुद्दा प्रसन्न होऊन सकारात्मक ऊर्जा मिळते.

तब्बेतीसाठी उपयुक्त

कापूर हा सर्दी,खोकलासाठी रामबाण ठरतो. कापराची वडी गरम पाण्यात टाकून वाफ घेतल्यास आराम मिळतो.

जीवजंतू नाहीशे होतात

घराच्या सगळ्या कोपऱ्यांत कापूर ठेवल्याने वातावरण शुद्ध राहते. जीवजंतू नाहीशे होतात.घरात असलेले किटक कापुर वापरल्याने नाहीशे होतात.

कापराच्या तेलाने मालिश केल्याने केस काळे व मजबूत होतात तसेच डोकंही शांत राहते. कापुर हाडांच्या दुखण्यासाठी सुद्दा गुणकारी आहे. कोमट तेलात कापूर टाकुन मालिश केल्यानं आराम मिळतो.

Share This News
error: Content is protected !!