हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या SHRIMANT BHAUSAHEB RANGARI GANPATI वतीने वासंतिक चंदन उटी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

SHRIMANT BHAUSAHEB RANGARI GANPATI: गणेशोत्सवात मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन; श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती व इंद्राणी बालन फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम

69 0

SHRIMANT BHAUSAHEB RANGARI GANPATI: श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि इंद्राणी बालन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवाच्या कालावधीत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

दर्शनासाठी आणि देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या गणेश भक्तांना या

मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ मिळणार आहे.

PUNEET BALAN ON KASHMIR GANESHOTSAV: पुनीत बालन यांच्या हस्ते काश्मिरी बांधवांना गणेश मूर्ती प्रदान

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांनी या उपक्रमाची माहिती दिली.

रंगारी गणपती ट्रस्ट आणि इंद्राणी बालन फाऊंडेशन यांच्या माध्यमातून गणेशोत्सवात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.

प्रामुख्याने गणेश भक्तांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले जात आहे.

या वर्षीही दि. २८ ऑगस्ट ते दि. ५ सप्टेंबर या कालावधीत सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळीत हे आरोग्य शिबीर होणार आहे.

या शिबिरात सीबीसी, कोलेस्टोरॉल, क्रेटिन, एसजीओटी, एसजीपीटी, आरबीएस, ब्लड, युरिन, बिलीरुबिन अशा महत्वाच्या तपासण्या होणार आहेत.

या तपासण्याचे अहवालही मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

आरोग्य शिबिरासाठी गणेशभक्त थेट आरोग्य शिबीरस्थळी नाव नोंदवून तपासणी करू शकतात तसेच

अधिदेखील ऑनलाईन पद्धतीने नाव रजिस्टर करून आपले नाव नोंदवू शकतात,

ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी लिंक – https://bit.ly/Aarogyashibir

PUNEET BALAN GROUP GANESHOTSAV KASHMIR: पुढील वर्षीपासून काश्मीरमधील पाच जिल्ह्यात गणेशोत्सवाची धूमधाम

भक्तांना चांगलं आरोग्य लाभावं, हा आपल्या अध्यात्माचा पाया आहे. पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाला येणाऱ्या भाविक-भक्तांसाठीही चांगलं आरोग्य लाभावं या हेतूने ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ आणि ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ने अध्यात्मिक उत्सवात आरोग्योत्सवाचा जागर करण्याचा निर्णय आम्ही घेतला. अधिकाधिक गणेश भक्तांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी केलं
Punit Balan : लष्कर आणि ‘पुनीत बालन ग्रुप’ने साकारले देशातील पहिले संविधान उद्यान
PUNIT BALAN GROUP DAHIHANDI: पुनीत बालन ग्रुप आयोजित संयुक्त दहिहंडी होणार डिजे मुक्त साजरी

Shrimant Bhausaheb Rangari Ganapati : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचा हेरीटेज वॉकमध्ये समावेश; पुणे महापालिकेची घोषणा

Share This News
error: Content is protected !!