भारताला स्वातंत्र्य मिळून आज 78 वर्ष पूर्ण होत असून यानिमित्तानं सर्वत्र मोठा उत्साह पहावयास मिळत आहे. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र भारताचं पाहिलं मंत्रीमंडळ कसं होतं याची माहिती देणारा TOP NEWS मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट
स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात एकूण 13 मंत्री होते. पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान असून त्यांच्याकडे परराष्ट्र संबंध आणि वैज्ञानिक अनुसंधान अशा खात्यांची जबाबदारी होती.
कसं होतं स्वतंत्र भारताचे पहिले मंत्रिमंडळ
1) पंडित.जवाहरलाल नेहरू, पंतप्रधान, परराष्ट्र संबंध आणि वैज्ञानिक अनुसंधान
2) सरदार वल्लभभाई पटेल, उपपंतप्रधान,गृह,माहिती आणि नभोवाणी,संस्थांनी संबंध
3) डॉ.राजेंद्र प्रसाद, अन्न व कृषी मंत्री
4) जगजीवन राय, श्रममंत्री
5) मौलाना अबुल कलाम आझाद,शिक्षणमंत्री
6) शामाप्रसाद मुखर्जी, उद्योग व पूरवठा मंत्री
7) डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कायदामंत्री
8) राजकुमारी अमृता कौर, आरोग्यमंत्री
9) बलदेव सिंग, संरक्षण मंत्री
10) आर.के. षण्मुगम चेट्टी. अर्थमंत्री
11) एच.सी.भाभा,वाणिज्य खाते
12) रफी अहमद कीडवई, संचार मंत्री
13) व्ही.एन.गाडगीळ, बांधकाम मंत्री