4 डिसेंबर : ‘भारतीय नौदल दिवस’; जाणून घ्या आजच्या दिवसाचा रंजक इतिहास…

263 0

आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे. दरवर्षी 4 डिसेंबर म्हणजे आजच्या दिवशी भारतीय नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्याच दिवशी भारतीय नौदलाने इतिहास घडवला होता. त्यामुळे भारतीय इतिहासात आजचा दिवस सोनेरी अक्षराने लिहला गेला आहे. भारतीय नौदलाचे सामर्थ्य आणि शौर्य गाजवणाऱ्या भारतीय नौदलाचा इतिहास काय आहे आणि आजच्याच दिवशी नौदल दिन का साजरा केला जातो.. जाणून घेऊया.

4 डिसेंबर 1971 मध्ये यु्द्धात भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या कराची नौदल तळावर हल्ला करुन तो उद्ध्वस्त केला होता. 1971 मध्ये बांगलादेश मुक्तीसाठी भारत पाकिस्तानमध्ये युद्ध झालं होतं. तेव्हा भारतीय नौदलाने ऐतिहासिक कामगिरी केली होती. भारतीय नौदलाच्या या अफाट कामगिरीमुळं पाकिस्तानचे दोन तुकडे पडले आणि बांग्लादेश स्वतंत्र झाला. हा दिवस भारतीय नौदलासाठी खूप अभिमानाचा आहे. त्यामुळे आजचा
दिवस नौदल दिन म्हणून साजरा केला जातो.दरवर्षी नौदल दिन साजरा करण्यासाठी वेगळी थीम ठरवली जाते. यंदा भारतीय नौदल दिन 2022 ची थीम “स्वर्णिम विजय वर्ष” अशी आहे.
भारतीय नौदलाच्या क्षेपणास्त्र नौकांनी कराचीमध्ये ऑपरेशन ट्रायडेंटवर विजय मिळवला होता. 1945 पासून दुसऱ्या महायुद्धानंतर 1 डिसेंबरला नौदल दिन साजरा केला जात होता. ही परंपरा 5 डिसेंबर 1972 पर्यंत पाळण्यात आली. त्यानंतर 1972 पासून फक्त 4 डिसेंबरला नौदल दिन साजरा केला जात आहे.भारतीय नौदलाची स्थापना 1612 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने केली होती. नंतर त्याला रॉयल इंडियन नेव्ही असं नाव देण्यात आलं. भारताच्या स्वातंत्र्यानंतर 1950 साली भारतीय नौदल अर्थाच इंडियन नेव्ही असं ठेवण्यात आलं. आजच्या दिवशी युध्द स्मारकाला पुष्प अर्पण केलं जातं आणि नंतर नौदलाच्या पाणबुडी, जहाजं आणि विमानांच्या ताकतीचं आणि कसरतींच प्रदर्शन करण्यात येतं.

Share This News
error: Content is protected !!