पुण्यातील सुप्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. अविनाश भोसले यांना येस बँक आणि डीएचएफएल बँक गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी अटक केली.
रिक्षाचालक ते उद्योगपती कसा आहे अविनाश भोसले यांचा प्रवास
अविनाश भोसले यांचं मूळ गाव सातारा जिल्ह्यातील तांबवे. वडिलांच्या नोकरीच्या निमित्तानं ते अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरला गेले. त्यांचे वडील जलसंपदा विभागात अभियंता म्हणून कामाला होते.
पुढे अविनाश भोसले पुण्यात आले आणि रिक्षा चालवण्याच्या व्यवसायात उतरले. यासोबत ते छोटछोटी बांधकाम कंत्राटं घेत होते.
अविनाश भोसले यांनी 1979 मध्ये ABILग्रुपची (अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्टचर लिमिटेड) स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी बांधकाम क्षेत्रात काम करायला सुरुवात केली.