अटल बिहारी वाजपेयी जयंती विशेष: अटलजींनी घेतलेले ५ महत्वाचे निर्णय ; ज्यामुळे भारताला मिळाली नवी दिशा

422 0

भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वाजपेयी यांची आज जयंती. अटलजींची जयंती गुड गव्हर्नन्स डे अर्थात सुप्रशासन दिवस म्हणून साजरा केला जातो. अटलबिहारी वाजपेयी म्हणजे भारताच्या राजकारणातील अजातशत्रू मितभाषी, अशी ओळख असलेले अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस सुप्रशासन दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली केली.

अटलजींनी सत्तेत असताना ५ महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते. ज्यामुळे भारताच्या विकासाला आणि भविष्याला एक वेगळं वळण मिळालं. हे निर्णय कोणते होते आणि त्याचा फायदा कसा झाला जाणून घेऊया.

१). पोखरण अणूचाचणी :- पोखरणमध्ये अणुचाचणी करणं हा अटलजींनी घेतलेला सर्वात मोठा धाडसी निर्णय. सत्तेवर येऊन काही दिवस झालेले असतानाच सर्व जगाचा दबाव झुगारून वाजपेयींनी ११ आणि १३ मे १९९८ रोजी पोखरणमध्ये पाच अणुचाचण्या केल्या. भारत अणुशक्ती संपन्न राष्ट्र झालं. अनेक बड्या देशांनी भारतावर आर्थिक निर्बंध लादले मात्र वाजपेयी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.

२).कारगिल युद्ध :- १९९९मध्ये पाकिस्तानने कारगील वर अतिक्रमण करत ताबा मिळवला. परवेज मुशर्रफ तेव्हा पाकिस्तानचे लष्कर प्रमुख होते. पंतप्रधान असलेल्या वाजपेयींनी तेव्हा आंतरराष्ट्रीय सीमे उल्लंघन न करण्याचा निर्णय घेत लष्कराला पूर्ण स्वातंत्र देऊ केले. आणि भारतानं कारगीलवर पुन्हा ताबा मिळवला.

३. ग्रामविकासाला प्रोत्साहन :- ग्रामीण रोजगाराला प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांनी खास योजना सुरू केली. ग्रामीण विकासासाठी केंद्राकडून मोठा निधी दिला.

४). शिक्षा अभियानाची सुरुवात :- देशभर सर्व शिक्षा अभियानाची सुरवात करून प्राथमिक शाळेत मुलांचं शिक्षण सुटू नये यासाठी केंद्राने खास मोहीम राबवली.

५).सुवर्ण चतुर्भुज योजना :- सुवर्ण चतुर्भुज योजना
ही वाजपेयींची महत्वाकांक्षी योजना. या योजनेनुसार देशाचे चारही कोपरे हायवेने जोडण्यात आले. दिल्ली,कोलकता,चेन्नई आणि मुंबई या मोठ्या शहरांना हायवेने जोडण्यात आले.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide