Pandharpur Wari 2025 : श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज जेजुरी इथं पोहोचली आहे. तर संत तुकाराम महाराजांची पालखी यवत येथे आहे. हळूहळू या दोन्ही पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतील. वारी काळामध्ये प्रत्येक जण आपापल्या परीने वारकऱ्यांची सेवा करत असतो. कुणी अन्नदान करतो, तर कुणी आरोग्य शिबिराचे आयोजन करतं (Pandharpur Wari 2025) तर कुणी आणखी काही…
याच पद्धतीने पंढरीला निघालेल्या वारकऱ्यांना युवराज ढमाले ग्रुप तर्फे १००० रेन सुट्सचे वाटप करण्यात आले. यावर्षीच्या वारी काळादरम्यान सतत पाऊस सुरू आहे आणि याचाच विचार करून रेनसेट्सचे वाटप करण्यात आले आहे.
पंढरीच्या वारीला निघालेल्या वारकऱ्यांना युवराज ढमाले ग्रुप तर्फे या वर्षी १००० रेन सूटसचे वाटप करण्यात आले. गेल्या १६ वर्षांपासून युवराज ढमाले ग्रुप वारकऱ्यांची सेवा करत आहे. विशेष म्हणजे या वारकऱ्यांना जी सुविधा अपेक्षित आहे, ती सुविधा ग्रुप तर्फे देण्यात येते. यावर्षी या दिंडीद्वारे करण्यात आलेल्या मागणीनुसारच या रेनसूटस चे वाटप करण्यात आले. याप्रसंगी युवराज ढमाले, वैष्णवी ढमाले, राजवीर ढमाले , काव्या ढमाले यांच्यासह युवराज ढमाले ग्रुप ची संपूर्ण टीम उपस्थित होती. भविष्यातही वारीला जाणाऱ्या विणकरी दिंडीला सेवा देण्याचा ग्रुपचा (Pandharpur Wari 2025) मानस आहे.
*TOP NEWS MARATHI : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी रथातील बैल उधळला