राज्यात परवापासून सर्वत्र अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. काल तर मराठवाड्यामध्ये वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. आज पुण्यात अवकाळी पाऊस सुरु झाला आहे.
पुण्यातील कोथरूड, कर्वेनगर, सिंहगड रोड, तळजाई यासह अनेक भागात पावसानं हजेरी लावली असून यामुळं वाहतुकीचा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळालं.
शिवाय पवना धरण क्षेत्रात देखील गारपिटीसह वरून राजानं हजेरी लावल्याचे पाहायला मिळालं