पुण्यात गेल्या अनेक दिवसांपासून लैंगिक अत्याचारांच्या घटना समोर येत आहेत. महिला अत्याचारांचं प्रमाण सातत्याने वाढत असताना आता पुण्यातून अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात पुन्हा एकदा एका शाळकरी मुलाशी अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकरण समोर आला आहे. याप्रकरणी त्याच्याच शाळेतील एका शाळकरी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही धक्कादायक घटना लष्कर भागातील एका शाळेच्या आवारात घडली. शाळेच्या आवारातील प्रसाधनगृहात पीडित मुलगा गेला होता. तेव्हा दुसऱ्या शाळकरी मुलाने त्याला धमकावून त्याला विवस्त्र होण्यास भाग पाडले. घाबरलेल्या मुलाने कपडे काढल्यानंतर त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आले. मे महिन्यापासून या मुलावर अत्याचार सुरू होते. त्यामुळे घाबरलेल्या या मुलाने अखेर पालकांना आणि शिक्षकांना याची कल्पना दिली.
या प्रकरणी आरोपी अल्पवयीन मुलाविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच इतर मुलांबरोबर असा काही प्रकार घडला आहे का याबाबत पोलीस तपास करत आहेत.
 
                         
                                 
                             
                             
                             
                            