पुणे : पुण्यामधून (Pune Scam) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये पुण्यातील एक मोठा घोटाळा समोर आला आहे. हा घोटाळा जवळजवळ 100 कोटींच्या आसपास आहे. यामध्ये जादा परताव्याच्या आमिषानं राज्याभरातील गुंतवणूकदारांना आपल्याकडे खेचून त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी बनावट कपंनीची निर्मिती केली, त्यानंतर पॉन्झी स्किमच्या नावाखाली गुंतवणूकदारांना जादा परताव्याचं आमिष दाखवण्यात आलं. महिन्याला दोन ते तीन टक्के दरानं मासिक परताव्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं. गुंतवणुकीसाठी कंपनीकडून वेगवेगळ्या स्कीम बनवण्यात आल्या, या स्कीमच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात भांडवलं उभारण्यात आलं. यानंतर जमा झालेला पैसा हा वेगवेगळ्या खात्यांमध्ये जमा करण्यात आला.
2020 मध्ये पुण्यातील आंबेगाव परिसरात या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. राज्यभरातील गुंतवणूकदारांना जादा पैशांचं आमिष दाखवून 2020 पासून त्यांच्याकडून पैसे घेतले जात होते. वेगवेगळ्या बँक अकाउंटमध्ये ही रक्कम जमा करण्यात येत होती. जमा झालेले पैसे हवालामार्फत परदेशात ट्रान्सफर केले जात होते अशी माहिती ईडीकडून देण्यात आली आहे.
या घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी आणि कंपनीचा मालक दुबईला पळून गेला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. ईडीकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. हा घोटाळा जवळजवळ 100 कोटींच्या आसपास आहे.