पुण्यातील पूर परिस्थिती नेमकी कशामुळे? महानगरपालिकेकडून समिती स्थापन

325 0

25 जुलै रोजी खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर पुण्यातील अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली होती या पार्श्वभूमीवर हा पूर्ण नेमका कसा आला. हे शोधण्यासाठी पुणे महानगरपालिकेने समिती नेमली असून ही समिती पुढील सात दिवसात आपला अहवाल सादर करणार आहे.

पुणे महानगरपालिकेने नेमलेले या समितीत महानगरपालिकेच्या पथविभाग बांधकाम विभाग आणि सांडपाणी व्यवस्थापन या तीनही विभागांचे प्रत्येकी एक अधिकारी तर जलसंपदा विभागाचे एक अधिकारी जे जलसंपदा विभागाचे निमंत्रित सदस्य आहेत अशा चार जणांचा समावेश करण्यात आला आहे ही समिती प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करून माहितीचा अभ्यास करून पुढील सात दिवसांमध्ये अहवाल देणार आहे.

Share This News
error: Content is protected !!