पुणे:पुण्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांची दाणादाण उडाली आहे. अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील व्यवस्थेचाही बोजवारा उडाला. पुण्यातील पूरस्थितीवरून विरोधकांनीही सरकारवर हल्लाबोल केला आहे आज सामना अग्रलेखातूनही पुण्यातील पुरस्थितीवरून भाजपच्या स्मार्टसिटी योजनेवर ताशेरे ओढत शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला असून त्यामुळे राजकारण तापले आहे.
भाषेवरुन कळते की तो सामनाचा अग्रलेख आहे. जे पाणी साचत पण मी पुणेकरांची दिलगिरी देखील व्यक्त केली तुम्ही जबाबदारी झटकली.पण २० वर्ष तुमची मुंबई पालिकेत सत्ता होती तुम्ही काय केलं असा सवाल उच्च व तंत्र शिक्षणमंत्री व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला सवाल पुण्यातील पत्रकार परिषदेत विचारला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी पुणे पोलीस आयुक्त कार्यालय येथे पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेला पुण्याचे माजी महापौर व भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने उपस्थित होते.
एकनाथ शिंदे यांनी शिंदे गट स्थापन केल्यामुळे शिवसेनेतील बऱ्याच आमदारांनी शिंदे गटात व भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसेनेमध्ये सहा, सात फक्त आमदार राहिले आहेत.त्यावरठाकरे गट कुठे राहिला .राहिलेले सहा सात ते ही वाटेवर आहेत.आज नाही सांगत परत सांगेल,माझ्या संपर्कात ४ जण आहेत. असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. त्यावर पत्रकार म्हणाले दादा तुम्हाला याबद्दल काही माहिती आहे का?कोण येणार ते त्यांना माहिती असेल. ते सांगतो म्हणाले ते असं नाही म्हणाले की चंद्रकांत दादा पाटील सांगतील ते त्यांना माहिती असेल. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
1 नोव्हेंबर पासुन पालकमंत्री काम सुरु करणार, फील्डवर जाऊन सगळा आढावा घेणार आहे. अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
पुणे हद्दीत सात नवीन पोलीस स्टेशन चालू होणार होती पण ती अजून काही चालू झाली नाही. त्यावर
पुणे हद्दीत 7 नवीन पोलीस स्टेशनचा प्रस्ताव, अर्थखात्यकडे पडला आहे.पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत 7 नवे पोलीस स्टेशन सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणार. असे पाटील म्हणाले.
पुण्यात जी वाहतूक कोंडी होत आहे पाणी साचत आहे. त्याबाबतीत अभ्यास केल्या नंतर अनेक विषय समोरं आले आहेत. यासाठी राज्य सरकार 50 टक्के निधी देणार. असे पाटील म्हणाले.