Weather Update

Weather Update : पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला हाय अलर्ट

390 0

मुंबई : मागील 1-2 दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला आहे. आजही राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मराठवाडा आणि विदर्भामध्ये आज वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने विदर्भात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादली वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने या भागांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.

Share This News
error: Content is protected !!