WARJE POLICE ROBBERY:दरोड्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यीय टोळीला पुणे पोलिसांनी रंगेहात पकडलं.
पुणे पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये सिनेस्टाईल धरपकड आणि पाठलाग झाला.
मात्र अखेर तीन पैकी एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलंय.
या घटनेचा थरारक व्हिडिओ देखील समोर आलाय.
VIDEO NEWS: Warje व Kothrud चे ‘ते’ Police कोण? Hagawane, Chavan चा अर्ज कुणी पुढं सरकवला? नावं जाहीर करा!
ही घटना आज पहाटे 4 च्या सुमारास वारजेतील म्हाडा कॉलनीजवळ घडली.
दरोडेखोरांची टोळी एका चारचाकी मधून परिसरात दाखल झाली. त्यांच्याकडे दरोडा टाकण्यासाठी ची सगळी हत्यार आणि धारदार शस्त्र होती.
याच परिसरातील एका घरावर (WARJE POLICE ROBBERY) दरोडा टाकण्याचं प्लॅन या दरोडेखोरांनी केला होता.
मात्र पहाटेच्या सुमारास जाग्या असलेल्या काही तरुणांनी घराच्या खिडकीतून हा प्रकार पाहिला.
त्याचा व्हिडिओ काढला आणि तात्काळ पोलिसांना फोन केला. पुढच्या काहीच वेळात पोलीस या ठिकाणी दाखल झाले.
पोलिसांना पाहून यातील एक आरोपी गाडीच्या मागे लपला. मात्र पोलिसांना त्याची कुणकुण लागताच तो पळून गेला.
त्याचवेळी पोलिसांनी सिने स्टाईल पाठलाग करत शिताफीने या दरोडेखोराला अटक केली.
सोनू कपूर सिंग टाक असं या अटक केलेल्या आरोपीचे नाव असून इतर दोन आरोपी मात्र पळून गेले.
या दरोडेखोरांची गॅंग ‘टाक गँग’ या नावाने ओळखली जाते.
Murlidhar Mohol : उद्योगांच्या विकासाला चालना देऊन बेरोजगारीची समस्या सोडविणार : मुरलीधर मोहोळ
या गॅंगवर पुण्यातील हडपसर, सांगवी, चतु:शृंगी, देहूरोड, हिंजवडी आणि नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान या प्रकरणी सोनू टाक, सचिन वाघमारे, सलीम, बाबा आणि त्यांच्या साथीदाराविरोधात वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर आरोपींचा शोध सुरू असून अटकेत असलेल्या सोनू कडून मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
EXCISE DUTY ACTION ILLIGAL ALCOHOL: गोव्यातून तस्करीसाठी आणलेला अवैध मद्यसाठा पुण्यात जप्त
२.५ किलो चांदीचे दागिने आणि धारदार हत्यारं, आणि दरोड्यांसाठी वापरलेली कारही पोलिसांनी हस्तगत केली आहे.