Vilas Tapkir

Vilas Tapkir : धनकवडी भागातील सामाजिक कार्यकर्ते विलास तापकीर यांचे निधन

724 0

पुणे : धनकवडी गावचे सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते व नगरसेविका वर्षाताई तापकीर यांचे पती स्व. विलासभाऊ महादेव तापकीर यांचे बुधवार दि. 17 जानेवारी, 2024 रोजी सायंकाळी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. ते 50 वर्षांचे होते. विलास तापकीर हे आमदार भीमराव तापकीर यांचे चुलत भाऊ होते. त्यांचा अंत्यविधी गुरूवार दि. 18 जानेवारी, 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता शांतीधाम स्मशानभूमी, धनकवडी पार पडला.

विलास तापकीर यांच्याविषयी बोलायचे झाल्यास ते धनकवडी भागातील मोठे प्रस्थ होते. त्यांचा अनेक सामाजिक कार्यात सहभाग असायचा. त्यांचे धनकवडी भागात मोठे नाव होते. त्यांच्या माघारी त्यांच्या पत्नी वर्षा तापकीर आणि दोन मुले असा परिवार आहे.

 

Share This News
error: Content is protected !!