प्रशासक म्हणून विराजमान झाल्यानंतर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचा दणका

442 0

पुणे- महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आज प्रशासकपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. पहिल्याच दिवशी शहरातील पदपथ आणि मोकळ्या जागांवर बेकायदेशीररित्या व्यवसाय करून विद्रुपीकरणात भर घालणार्‍या अनधिकृत व्यावसायिकांना दणका दिला आहे.

पदपथ आणि इमारतींच्या ओपन स्पेसवर सुरू असलेले बेकायदा व्यवसाय आणि अतिक्रमणे तातडीने काढून घ्यावेत अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. आता या आदेशामुळे मात्र शहरात अतिक्रमण कारवाई जोरात होणार, हे नक्की मानले जात आहे. कारण यापूर्वी कारवाई करताना नगरसेवक मध्यस्थी करायचे. मात्र आता नगरसेवकांचा कालावधी संपला आहे. त्यामुळे प्रशासनाला आता मोकळीक मिळाली आहे.

महापालिकेच्या नगरसेवकांची सोमवारी (दि.१४ मार्च) मुदत संपली आहे. आता  प्रशासक म्हणून महापालिका आयुक्त विक्रम कुमार हे कामकाज पाहाणार आहेत. पहिल्याच दिवशी विक्रम कुमार यांनी शहरातील रस्ते आणि मोकळे करण्यास प्राधान्य दिले आहेत. पदपथ, रस्त्यांच्या कडेला आणि इमारतींच्या साईड, फ्रंट मार्जीनमध्ये सुरू असलेले पथारी व्यवसाय, हॉटेल्स व अन्य व्यवसाय तातडीने बंद करावेत. तसेच यासाठी उभारण्यात आलेले तात्पुरते मंडप, स्ट्रक्सर्च संबधित व्यावसायीकांनी काढून घ्यावेत, असे आदेश दिले आहेत. यानंतरही बेकायदा व्यावसायीक आढळल्यास त्यांच्यावर अतिक्रमण विभागाच्यावतीने कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Share This News

Related Post

‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; 1 कोटी 70 लाख रुपयांची विदेशी दारू जप्त

Posted by - December 29, 2022 0
पुणे : राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईमध्ये तब्बल दोन हजारांहून अधिक बॉक्स साठा…
Raigad News

Raigad News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घटनास्थळी धाव घेत दुर्घटनाग्रस्तांना दिला धीर

Posted by - July 20, 2023 0
रायगड : आजची सकाळ ही रायगड जिल्ह्यातील (Raigad News) खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी या गावासाठी काळरात्र ठरली. या ठिकाणी (Raigad News)…

पुरोगामी विचाराला मारण्याचे पाप करणाऱ्या भाजपाला कसबा पेठेतील जनतेने धडा शिकवला; पोटनिवडणुकीच्या विजयाचा टिळक भवनमध्ये मिठाई वाटून जल्लोष

Posted by - March 2, 2023 0
मुंबई : कसबा पेठ या भाजपाच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. गेली…
Neelam Gorhe

दीपावलीच्या निमित्ताने राज्यातील शेतकरी महिला, उद्योजक यांच्या शेतमालाला भाव आणि असंघटित कामगारांसाठी सरकारने धोरण आखावे

Posted by - October 23, 2022 0
केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार सुमारे ८० टक्के महिला आर्थिक क्षेत्रात सक्रिय आहेत. यात कृषी क्षेत्रात ३३…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *