पुणे : सध्या बारामती लोकसभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या ठिकाणी नणंद विरुद्ध भावजय असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच हा मतदार संघ विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांच्यामुळे अजून चर्चेत आला आहे. विजय शिवतारेदेखील या ठिकणाहून लोकसभा लढवण्यावर ठाम आहेत. यादरम्यान विजय शिवतारे यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. आपण वेळ पडल्यास बारामतीमध्ये भाजपच्या कमळ चिन्हावरही लढू असे वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले विजय शिवतारे?
विजय शिवतारे यांनी आपण कोणत्याही परिस्थितीत बारामतीमधून निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे सांगितले. अजित पवार यांनी पुरंदर तालुक्यातील जनतेचे नुकसान केले आहे. त्यामुळे मला पवार घराण्याविरोधातील मतं मिळतील. माझ्यावर शिवसेना पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई झाली तरी मी बारामतीची लोकसभा निवडणूक लढवणारच, असे विजय शिवतारे यांनी ठणकावून सांगितले.
एकनाथ शिंदे आणि विजय शिवतारेंमध्ये काय झाली चर्चा?
एकनाथ शिंदे यांना ही गोष्ट सांगितली होती. पण त्यांनी म्हटले की, महायुतीत बारामतीची जागा अजित पवार गटाला सुटली आहे. पण सुनेत्रा पवार पराभूत होणार आहेत. त्यामुळे महायुतीचे नुकसान करण्याऐवजी ही जागा शिवसेनेला द्यावी. मी धनुष्यबाणाच्या चिन्हावर बारामती लोकसभेची निवडणूक जिंकून दाखवेन, असा दावा विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर केला होता. परंतु, त्यानंतरही एकनाथ शिंदे यांनी बारामतीची जागा शिवसेनेसाठी मागून घेण्याविषयी असमर्थता व्यक्त केली होती. आपल्याला युतीधर्माचे पालन करावे लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी विजय शिवतारे यांना सांगितले होते.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Rohit Pawar : शिंदे सरकारने कोट्यवाधींचा घोटाळा केल्याचा रोहित पवारांचा आरोप
Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! ‘हा’ नेता लागला मुख्यमंत्री शिंदेंच्या गळाला
Lok Sabha Elections : सुप्रिया सुळेंचं पुणे पोलीस अधीक्षकांना पत्र; म्हणाल्या…