Vasant More and Amol Mitkari

Vasant More : आधी वंचित मध्ये पक्षप्रवेश आता अमोल मिटकरींशी भेट; वसंत मोरे यांच्या भेटीगाठी अजूनही सुरूच

557 0

पुणे : पुणे लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंत मोरे यांनी दोन दिवसांपूर्वीच अधिकृतरित्या वंचित मध्ये प्रवेश केला. वंचित चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या अकोल्यातील निवासस्थानी हा पक्षप्रवेश झाला. मात्र आज वसंत मोरे यांनी चक्क राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांची भेट घेतली. या भेटीमुळे सध्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

वसंत मोरे हे पक्षप्रवेशासाठी अकोल्यात गेले असता त्यांनी आज अमोल मिटकरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. मिटकरींच्या घरी वसंत मोरे यांचे आनंदाने स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी बराच वेळ चर्चाही केली. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरीही ही भेट केवळ कौटुंबिक नसून राजकीय असल्याचे बोलले जात आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान या भेटीची छायाचित्र सध्या व्हायरल होत आहेत. वसंत मोरे यांनी वंचित कडून उमेदवारी मिळण्याआधी शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रवींद्र धंगेकर, मोहन जोशी, रूपाली ठोंबरे, मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. अनेक पक्षांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला मात्र अखेर आंबेडकरांशी त्यांचे सूर जुळले आणि त्यांनी वंचितचा झेंडा हाती घेतला.

आज अचानक वसंत मोरे यांनी मिटकरी यांची भेट घेतल्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. पण अद्याप दोन्ही नेत्यांकडून भेटी मागचे कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. एकीकडे मंगलदास बांदल यांनी पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेतल्यामुळे त्यांची उमेदवारी प्रकाश आंबेडकर यांच्याकडून रद्द केली गेली आहे. त्यातच आता वसंत मोरे यांनी मिटकरींची भेट घेतल्यामुळे मोरेंना रोशाला सामोरे जावे लागणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Eknath Khadse : शरद पवारांना मोठा धक्का ! एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार

Weather Update : महाराष्ट्राला पुन्हा अवकाळी पावसाचा बसणार फटका; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला हायअलर्ट

Mangaldas Bandal : मंगलदास बांदल यांची लोकसभेची उमेदवारी वंचित कडून रद्द

Pune Accident Video : पुण्यात भरधाव कारची दोघांना धडक ! CCTV फुटेज आलं समोर

Rajashree Patil : चर्चेतील चेहरा : राजश्री पाटील

Pimpari News : चिखलीत भंगाराच्या गोदामाला भीषण आग

Solapur Accident : सोलापूरमध्ये कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; शिक्षकाचा जागीच मृत्यू

Shrikant Shinde : अखेर ! श्रीकांत शिंदेना उमेदवारी जाहीर; फडणवीसांनी केली घोषणा

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!